२ ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवसा निमित्त बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने नाट्यछटा, एकपात्री, स्कीट , असा बाल कलाविष्कार तसेच बालनाट्य स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त बालकलाकार आणि बालनाट्य संस्था यांचा गुणगौरव सोहळा, बालनाट्य चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री अंबादास जोशी यांचा सन्मान आणि पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात संपन्न.
कल्याण :- २ ऑगस्ट # मराठी_बालनाट्य_दिवस
रत्नाकर मतकरी लिखित व सुधा करमरकर दिग्दर्शित ‘ मधुमंजिरी ’ या बालनाट्याचा पहिला प्रयोग २ ऑगस्ट १९५९ रोजी झाला होता.इथूनच मराठी रंगभूमीवर बालनाट्याच्या पर्वाला सुरुवात झाली.रत्नाकर मतकरीं प्रमाणेच सुधा करमरकर यांचेही ‘मधुमंजिरी’ हे पहिलेच बालनाट्य होते. तिकीट विक्री करून साहित्य संघात झालेले ते पहिले व्यावसायिक बालनाट्य होते. या नाटकाच्या निमित्ताने सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर या संस्थेचीही स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य,या बालनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग आणि लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना या त्रिवेणी योगावर शिक्कामोर्तब करत बालरंगभूमी परिषदेकडून २ ऑगस्ट हा दिवस ‘मराठी बालनाट्य दिवस’ म्हणून जाहीर करण्यात येवून,विविध उपक्रमांच्या माध्यमातून बालकलाकारांच्या हक्काचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्यात येनार आहे.
बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने मराठी बालनाट्य दिवसा निमित्त नाट्यछटा, एकपात्री अभिनय,स्कीट अश्या बालकलाविष्कारांच आयोजन करण्यात आलं होतं.अनेक बालकलाकारांनी आपली कला सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच बालनाट्य चळवळीतील ज्येष्ठ रंगकर्मी श्री.अंबादास जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन मोठ्या दिमाखात सन्मान करण्यात आला.या समयी बालनाट्य स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त केलेल्या बालकलावंतांना तसेच बालनाट्य संस्थांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र करून गौरविण्यात आले. तसेच बालनाट्य चळवळ अविरत जोपासणाऱ्या अनेक मान्यवर कलाकारांचा गुणगौरव देखील बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाला हास्यजत्रा फेम सिने-नाट्य अभिनेते प्रभाकर मोरे यांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ रंगकर्मी अंबादास जोशी ,अभिनेते प्रभाकर मोरे शालेय समिती अध्यक्ष श्री राधाकृष्ण पाठक, मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर मेटकरी सर, सुभेदार वाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याधापिका*सौ कल्पना पोतदार, प्रवास वर्णन लेखक प्रविण कारखानीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा अध्यक्ष श्री रवींद्र सावंत,कोशाध्यक्ष श्री हेमंत यादगिरे, बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या अध्यक्षा सुजाता किरण डांगे, प्रमुख कार्यवाह श्री शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष श्री संजय गावडे आदि मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या वतीने सर्व मान्यवर पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे प्रमुख कार्यवाह शिवाजी शिंदे यांनी केले त्यावेळी त्यांनी मराठी बालनाट्य दिवसाची सुरूवात कशी झाली हे सांगत सन्मानित सर्व बालकलाकार,बालनाट्य संस्था यांचे कौतुक करत पुढीलवाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमासाठी रंगमंच उपलब्ध करून दिल्या बद्दल सुभेदार वाडा शाळेच्या अध्यक्ष,मुख्याधपक, मुख्याधापिका यांचे विशेष आभार मानले.
मराठी बालनाट्य दिवसाचे औचित्य साधून कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक लेखक,साहित्यिक वसंत काल्हापुरे यांच्या माझे देश विदेश पर्यटन या त्यांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी सुभेदार वाडा शाळेचे शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी, पालक , कल्याणातील बालकलाकार , बालनाट्य संस्थेचे पदाधिकारी तसेच बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेचे सह कार्यवाह विशाल पितळे, मेघा शृंगारपुरे, कार्यकारिणी सदस्य सौरभ रमेश आरोटे, प्रेमा सातपुते श्री नटराज मोरे, श्री अजय पाटील, ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष श्रीमती सुनीता मोरांनकार आदी आवर्जून उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालरंगभूमी परिषद कल्याण शाखेच्या कार्यकारिणी सदस्य मनिषा साबळे यांनी केले व उपाध्यक्ष संजय गावडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता करण्यात आली.



.jpeg)

0 टिप्पण्या