मल्हार २०२५ चा प्रारंभ ‘मल्हार मेट - अ‍ॅन इंडी गाला’ या कलात्मक सोहळ्याने संपन्न




देशातील सर्वात लोकप्रिय महाविद्यालयीन उत्सवांपैकी एक असलेला मल्हार, यंदा आपल्या ४६ व्या आवृत्तीमध्ये प्रवेश करत आहे. या उत्सवाची झलक २७ जुलै रोजी झालेल्या “मल्हार मेट – अ‍ॅन इंडी गाला” या कार्यक्रमातून पाहायला मिळाली. संत झेवियर्स कॉलेज, मुंबईत आयोजित या कार्यक्रमात संगीत, कला आणि रंगतदार वातावरण यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. संध्याकाळ उत्साहाने नटलेली होती.


मुंबईभरातील विद्यार्थ्यांनी रेड कार्पेटवर आत्मविश्वासाने वावरत कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. पापाराझी स्टाईलमध्ये कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकत असताना सर्वांनी आपल्या आकर्षक पोशाखात स्टाईलिश पोज दिल्या. संपूर्ण हॉल झगमगाट आणि पसरलेल्या उत्साहात भरलेला होता. 


या संध्याकाळी भावनांचा सुरेल स्पर्श दिला तो प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार चरण यांनी, जे “वेख सॊण्यां” या गाण्यामुळे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांसोबत भावनिक नाळ जोडली. कार्यक्रम जसजसा पुढे सरकला, तसतसे रॅप बॅटल्स, डान्स बॅटल्स आणि डीजेने वातावरणात ऊर्जा निर्माण केली. संध्याकाळ सुरेल गाण्यांपासून जल्लोषपूर्ण बीट्सकडे सहजपणे सरकली आणि संपूर्ण कार्यक्रमात उत्साही वातावरण टिकून राहिलं.


विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध स्टॉल्समुळे या अनुभवाला आणखी रंगत आली – फाईन आर्ट्सच्या फेस पेंट बूथ पासून DnM मर्च स्टॉल आणि लक्षवेधी फोटो बूथ पर्यंत, प्रत्येक गोष्टीने कार्यक्रमाला खास स्पर्श दिला. या गोष्टींमुळे उपस्थितांना केवळ आठवणी नव्हे, तर त्यांचे खास अनुभव आणि क्षण सोबत घेऊन जाता आले - जे त्यांना मल्हारची सतत आठवण करून देतील.



मल्हार मेट-अ‍ॅन इंडी गाला ही केवळ सुरुवात नव्हती; ती होती सर्जनशीलता, वैयक्तिक अभिव्यक्ती आणि मल्हारच्या सामूहिक आत्म्याचं एक जिवंत प्रतिबिंब. या अविस्मरणीय रात्रीच्या यशावर आधारित, मल्हार आता अधिक प्रेरित झाला आहे. येणाऱ्या मुख्य उत्सवाला १४, १५ आणि १६ ऑगस्ट २०२५ रोजी अधिक भव्य, अधिक जोरदार आणि अधिक संस्मरणीय बनवण्यासाठी आमची संपूर्ण टीम उत्साहाने सज्ज आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या