छत्रपती संभाजीनगर : भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर,राष्ट्रीय महासचिव राहुल शेंडे आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी नुकतीच केली असून अध्यक्षपदी रविंद्र गुरचळ ( मुंबई) तर महासचिव म्हणून विजय बनसोड ( गडचिरोली) यांची एकमताने निवड करण्यात आली.

उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष:विजय वासे,सहायक सचिव:हेमंत जाधव, कोषाध्यक्ष : रविकांत जाधव,मुख्य संघटक : बुधाजी वाढविंदे, संस्कार व शिक्षण : अरुणा इंगळे, प्रोग्राम समन्वयक: सचिन कवाडे, प्रिंट व स्टेशनरी : समन्वयक विलास जाधव, मुकेश कांबळे, तक्रार निवारण समन्वयक : तुषार गोरे, मीडिया समन्वयक : डॉ.डी.एन.जाधव, सदस्य म्हणून कैलाश ढेंगळे, सुरेखा महिरे, प्रीती रामटेके, रामदास घेवंदे,विधीज्ञ सोनाली मेश्राम,छाया हिवाळे ,मंगला बिरारे, निरंजन जाधव, महेंद्र मेश्राम, तर कोकण विभाग :सुधीर धामणकर, महेंद्र जाधव, पुणे विभाग :राजश्री गायकवाड, सुजाता सोनकांबळे, नाशिक विभाग: शुभांगी डोंगरे, शालीग्राम गायकवाड,औरंगाबाद विभाग: किरण सोनवणे, गणपत भद्रे, अमरावती विभाग: महादेव तायडे, अनिल वानखेडे आणि नागपूर विभाग प्रभारी म्हणून अशोक गडकरी ,नीरज ताकसांडे यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.अशी माहिती राज्य मीडिया समन्वयक डॉ.डी.एन.जाधव यांनी दिली.
0 टिप्पण्या