विषय-भेटी लागे जीवा

 



विषय-भेटी लागे जीवा 

भक्तीचा भंडार भाळी 

ब्रम्हानंदी लागे टाळी 

सुखी नाम श्रीकृष्ण हरी 

पुढं पुढे चालती वारी 

      

विठ्ठल रखुमाई माझी

विठ्ठल रखुमाई 


लाखो वारकरी रमती इथं

धर्म कूळ विसरून जात

येती गरीब कुणी श्रीमंत 

हरी नाम मुखाने गात


वृंदावन घेऊन डोई

बाया दंगती विठू रंगात

टाळ मृदंग विनाशकारी

वैष्णवांची अखंडीत साथ


माणसाला माणूस कळण्याची

लाभे इथे पुण्याई 

विठ्ठल रखुमाई माझी 

विठ्ठल रखुमाई माझी 


नदीला भेटाया सागर आला

असा वाहतो जरा तिथे 

होऊनी राहिली अशी 

चंद्रभागेची कथा


शरण जावूनी पधरीनाथा 

चरणी ठेवू माथा

विकट वाट वहिवाट ही

दुःख क्लेश अन् व्यथा 



परंपरेतुन परमार्थाची अगाध

हि नवलाई विठ्ठल रखुमाई चार

वारकरी चालला पंढरपुरी 

विठ्ठल रखुमाई माझी




सौ सुनिता खैरनार 

कल्याण वेस्ट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या