माजी सरपंच श्री. प्रभाकर ढवळ गुरुजी यांचा मठात झाला सत्कार.



माजी सरपंच श्री. प्रभाकर ढवळ गुरुजी यांचा मठात झाला सत्कार. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे जांभळगाव येथील माजी सरपंच आणि माजी शिक्षक श्री. प्रभाकर यशवंत ढवळ यांचा सपत्नीक सत्कार तालुका कुडाळ  आंदुर्ले गावातील "परम पूज्य सद्गुरु स्वामी समर्थ नामदेव महाराज वटवृक्ष निवासी" यांनी मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी जन्मोत्सवदिनी मठाचे अध्यक्ष डॉ.दीपक ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली माजी शिक्षक व माजी सरपंच श्री प्रभाकर ढवळ गुरुजी यांचा मठातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी गुरुजींच्या धर्मपत्नी सह त्यांचा भाचा श्री.हेमंत चिपकर आणि मठातील पुजारी व अन्य भक्तगण उपस्थित होते. 



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे जांभळगाव येथील माजी सरपंच आणि माजी शिक्षक श्री. प्रभाकर यशवंत ढवळ गुरुजी हे तसे पंचक्रोशीतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचे असे सर्वसामान्यात राहून असामान्य असे व्यक्तिमत्व म्हणून खरोखच सर्वांच्याच ते परिचित आहेत. कुठच्याही पदाची अथवा पतपेशांची त्यांना मुळीच घमेंडी नाही. असे हे स्वाभिमानी व्यक्तिमत्व, संपत्तीचा मोह अथवा गर्व न बाळगणारे, आणि धार्मिक वृत्तीचे, अडीअडचणीच्या वेळी गरीब गरजूंना संकट समयी मदतीला धावणारे असे हे शांत आणि संयमी मनमिळावू असे व्यक्तिमत्व. अशा या त्यांच्या साधेपणा, मितभाषी आणि मनमिळावू स्वभावनेच सर्वांनाच ते आवडीचे आहेत.असे प्रत्येकास आकर्षून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री प्रभाकर ढवळ गुरुजी होय. 


नरडवे गावात जेव्हा दळणवळणाची आणि वीजची जेव्हा सोय नव्हती तेव्हापासून ते जनसेवेसाठी नेहमीच तत्पर असायचे. विशेष म्हणजे हा वारसा त्यांनी त्यांचे चुलते माजी सरपंच भिकाजी ढवळ यांच्या पासून मिळालेल्या प्रेरणेतून पूर्वापार पासून चालत आलेला हा वारसा त्यांनी अद्ययावत जपून ठेवलेला आहे. त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा एक सोज्वळ गृहिणी आहेत. त्यांचाही घरच्या आणि बाहेरील कामांतही गुरुजी यांना त्यांच्या धर्मपत्नी यांचा मोठा सहभाग असतो. 

जेव्हा गावात 45 वर्षापूर्वी वीज नव्हती तेव्हा त्यांनी गावातील लोकांसाठी भात आणि पिठाची चक्की (डिजेलवर चालणारी) त्यांनी चालू केली होती. त्यावेळी आम्ही लहान होतो. तरी आठ वर्षाचे होतो. त्यावेळचे ते जुने दिवस आम्हास अजून आठवतात. लोक गरीब परिस्थितीत राहत होते.


या सर्वाचा विचार करूनच ठाणे डोंबिवली येथील नवचैतन्य सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष  तसेच वृत्तपत्र साप्ताहिक "स्नेहसंयोग" संपादक आणि "संतोष प्रकाशन"चे  संस्थापक संपादक  वर्धापन दिनी घेतलेल्या कार्यक्रमात २०१८ साली अध्यक्ष संतोष सावंत यांनीही कल्याण डोंबिवलीच्या महापौर सौ.विनिता राणे यांच्या हस्ते प्रभाकर ढवळ गुरुजी यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

सध्या ते "नरडवे धरणग्रस्त समन्वयक समिती" (मुंबई) यांच्याशी सलग्न असणारी गावची "नरडवे धरणग्रस्त कृती समितीचे" ते सचिव या पदावर कार्यरत आहेत. "श्रीब्राह्मणदेव मंदिराच्या समिती"चे सुद्धा ते अध्यक्ष असून ७५ व्या वयातही अगदी तरुण व्यक्तीसारखे ते कामात तत्पर असतात. 



लेखक: कवी श्री.संतोष सावंत✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या