वनिता फाउंडेशन ,सम्यक चॅरिटेबल ट्रस्ट व नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने 20 जुलै रोजी राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनाचे आयोजन.




वनिता फाउंडेशन ,सम्यक चॅरिटेबल ट्रस्ट व नॅशनल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने 20 जुलै रोजी राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनाचे आयोजन.

----------------------------------------

मुंबई (प्रतिनिधी ) वनिता फाउंडेशन मुंबई, सम्यक वैद्यकीय शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व नॅशनल टॅलेंट बुक ऑफ हुमन  रेकॉर्ड व समृद्धी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10.30  वाजता ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालय पहिला मजला रेगे सभागृहात राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये " सन्मान कार्यकर्तृत्वाचा" व सन्मान राष्ट्राचा"  म्हणजेच आपल्या जीवन भरारीत   दुसऱ्याच्या हक्कासाठी ध्येयासाठी व विचारासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीच्या व संस्थेच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी तसेच स्वपंख्याच्या बळावर नवी क्षितिजे  निर्माण करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचे वनिता फाउंडेशनचे अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे ,सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव व समृद्धी प्रकाशनचे संचालक  प्रा. डॉ. बी एन खरात यांनी आमच्या  प्रतिनिधीशी बोलताना सांगितले 

        या राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते शेखर फडके, ठाणेच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र सखे उद्योजक दिनेश उघडे अभिनेता व दिग्दर्शक सुयस शिर्के ,राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तुकाराम पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्र सन्मान सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी समृद्धी प्रकाशनचे संचालक प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात असून संमेलनाचे आयोजन वनिता फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे व सम्यक वैद्यकीय शिक्षण अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले असून श्वेता शिर्के गणेश अमृतकर कल्पना शिंदे विशाल देशमुख आदी मान्यवरांनी संमेलनाचे संयोजन करणार असून या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा गौरव प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याने संमेलनाला सहकुटुंब सहपरिवारासह बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान वनिता फाउंडेशनच्या सचिव व वनिताताई प्रभाकर कांबळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या