संत झेवियर्स कॉलेज, मुंबईचा प्रतिष्ठित वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सव मल्हार यंदा १४, १५ आणि १६ ऑगस्ट २०२५ रोजी भव्य स्वरूपात साजरा होणार आहे.
मल्हार म्हणजे झेवियर्सच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आनंदाचा उत्सव आणि आठवणीत राहणारा अनुभव. दरवर्षी संत झेवियर्स कॉलेजचे विद्यार्थी हा फेस्ट स्वतः आयोजित करतात ज्याला २०,००० लोकांची उपस्थिती लाभते. यात वेगवेगळे कार्यक्रम, स्पर्धा आणि सादरीकरणे असतात, ज्यामुळे संपूर्ण कॉलेज चैतन्याने भरून जाते. आतापर्यंत रोहित सराफ, दिया मिर्झा, इम्रान खान, अनुपम खेर, नसरुद्दीन शाह, प्राजक्ता कोळी, श्रीया पिळगांवकर आणि विजय वर्मा यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मल्हारमध्ये हजेरी लावली आहे. अशा कलाकारांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे मल्हार दरवर्षी खास आणि अविस्मरणीय ठरतो.
“द वर्ल्ड विदिन” ही यावर्षाची मूळसंकल्पना “अंतरविश्व” , आपल्यातल्या भावना, कल्पकता आणि अंतर्मुख विचारांना समोर आणते. आजच्या धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जगात, आपली प्रेरणा आणि भावना शोधणे, हेच या मूळसंकल्पनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या वर्षाचे मल्हारचे चिन्ह (लोगो) सेल्टिक त्रिकेत्रा या प्राचीन प्रतीकावर आधारित आहे. ह्या चिन्हातल्या तीन गुंफलेल्या वक्ररेषा आपल्यातले विश्व प्रतिबिंबित करतात- ह्या चिन्हात दर्शवलेले - पहिले, एक चंद्र आणि ढगांसह, आपल्या स्वप्नांनी बनणारे वरचे जग; दुसरे, डोंगर व वृक्षांसह, नात्यांतून उलगडणारे सभोवतालचे जग; आणि तिसरे, समुद्रलाटांसह, भावना, आठवणी व अंतर्ज्ञानाने भरलेले अंतर्गत जग. या त्रयीच्या केंद्रस्थानी असलेला सोन्याचा तारा या तीनही विश्वांना घट्ट धरून ठेवतो तर त्याभोवतीचे जाळे हे जीवनाच्या अनेक गोष्टींच्या अवलंबनाचं प्रतीक आहे. बाहेरच्या वर्तुळावर कोरलेले I ते XX रोमन अंक माल्हारच्या २० विभाग दर्शवतात- प्रत्येक एक स्वतंत्र विश्व असुनही एकत्र येऊन एक सामायिक विश्व: द वर्ल्ड विदिन तयार करतात.
कथा, नृत्य आणि नाट्य यांचे सूर, मल्हार २०२५ च्या तीन दिवसांच्या उत्सवात कला, साहित्य आणि आनंदाच्या रूपाने खुलून दिसणार आहेत म्हणूनच, “द वर्ल्ड विदिन” ही मूळसंकल्पना प्रत्येक हृदयात असलेल्या अमुर्ताचा शोध आहे - एक असा उत्सव, जो स्वतःच्या अंतरविश्वाची वाट दाखवतो आणि आपल्या जाणिवा, दृष्टिकोन समृद्ध करतो. आपणही मल्हार २०२५ मध्ये सहभागी व्हा कारण इथे विश्व केवळ आपल्या भोवती नाही, तर आपल्या अंतर्मनातही खोलवर समावलेला आहे.
0 टिप्पण्या