चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्या समाज सेविका प्रिया गणेश खेडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न..

.



 चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्या समाज सेविका प्रिया गणेश खेडेकर यांच्या उपस्थितीत संपन्न..

महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ,गट कार्यालय अंधेरी कामगार कल्याण केंद्र सान्ताक्रुझ, येथे बाल चित्रकला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत अनेक बाल चित्रकारांनी सहभाग घेतला.स्पर्धेत उत्तम आणि  उत्कृष्ट चित्रकारासह सर्वच बाल चित्रकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मार्गदशन करताना प्रिया गणेश खेडेकर यांनी चित्रकलेच्या पैलूंवर प्रकाश टाकला चित्र कागदांवर, कपड्यांवर, भिंतींवर सुध्दा काढता येतात परंतु ते काढण्याची प्रत्येक चित्रकाराची एक शैली असते कला असते ती सहज उमजत.नाही ती शिकावीच लागते चित्रकार क्षेत्रात देखील अनेक मान्यवरांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.



चित्रकार म्हणजे जो चित्र काढतो किंवा जो रंगांच्या माध्यमातून कला साकारतो. हे विविध माध्यमांवर केले जाते, जसे की कागद, कपडा, किंवा भिंत. चित्रकार वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करतात आणि त्यांची कला व्यक्त करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात, चित्रकला ही कला प्रकारांपैकी एक आहे,जिथे चित्रकार वेगवेगळ्या माध्यमांवर रंग, आकार आणि रेषा वापरून कलाकृती तयार करतात, चित्रकारांची शैली विविध असू शकते, जसे की वास्तववादी चित्रकार विविध तंत्रांचा वापर करतात, जसे की रंग, रेषा, आकार, आणि प्रकाश. ते विविध प्रकारच्या रंगांचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतात, काही प्रसिद्ध चित्रकार आहेत, जसे की अमृता शेर-गिल, राजा रवि वर्मा, आणि दीनानाथ दलाल, जगातील प्रसिद्ध चित्रकारांमध्ये लिओनार्डो दा विंची, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, पाब्लो पिकासो, क्लॉड मोनेट आणि रेम्ब्रँट यांचा समावेश होतो. एम एफ हुसेन हे चित्रकार त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले जातात, त्यांनी नवीन तंत्रांचा शोध लावला आणि प्रेक्षकांवर कायमचा ठसा उमटवला.



सदर कार्यक्रमा बाल चित्रकारांसह नागरीकांची उपस्थितीत वाख्याजोग होती विभाग अधिकारी सौ.सुषमा सावरटकर मॅडम यांनी केंद्र अगदी शिस्तबद्ध पध्दतीने विभागातील जनतेशी नाळ जोडुन ठेवली आहे.अतिशय सुंदर आणि शान काम करतात त्यांचे अभिनंदन. तसेच प्रिया गणेश खेडेकर यांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या