एक जाहीर आवाहन





 वस्तू व सेवा कर विभागातील राजपात्रित अधिकारी संघटना/तृतीय श्रेणी वर्ग कर्मचारी संघटना/चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना/मंत्रालय तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना, मुंबई यांना एक जाहीर आवाहन.🙏

----------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

    

 "खुपच प्रयत्नांनी त्यांची पदोन्नती झाली. त्यामुळे विशेष कौतुक. " 


असे विधान  संघटनेचे एक मोठे नेते, मा. विनोद देसाई साहेब, यांनी नुकतेच केलेले होते.  हे त्यांचे वरील विधान संपुर्ण महाराष्ट्र राज्यभरात चांगलेच गाजले.


    महाराष्ट्राची  शान असलेली व उपनगरीय वस्तू व सेवा कर भवन, वांद्रे  विभागात  दूरध्वनी चालक (अंध-दिव्यांग) या पदावर काम करीत असलेली श्रीमती नेहा पावसकर ह्यांची नुकतेच दिनांक १९.०५.२०२५ रोजी श्रीमती सुजाता सौनिक, मुख्य सचिव यांच्या हस्ते सचिवालय जिमखाना येथे गौरव करण्यात आला.  श्रीमती नेहा पावसकर ह्या एका अतिसामान्य कुटुंबातील असुन त्यांना २ वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती, शिवछत्रपती पुरस्कार विजेती व राष्ट्रीय पातळीवरती  ईतर अनेक विविध  खेळामध्ये प्राविण्य मिळवलेली अशी अनन्य साधारण  व्यक्तिमत्व असलेली अंध-दिव्यांग महिला आहे.  परंतु नेहा पावसकरने मांडलेली तिची व्यथा दूर करण्यास कोणत्याही  संघटनाने प्रयत्न हा केलेला नाही अथवा कुणीही पुढाकार घेतलेला नाही, याबाबत आश्चर्य वाटते.!!!  त्यामुळे  माणसांची संवेदन शीलताच संपलेली  आहे की काय??? असा प्रश्न माझ्यासारख्या  सामान्य नागरिकाला पडलेला आहे.


आता तरी या राष्ट्रीय पुरस्कार विजेती  असलेल्या श्रीमती नेहा पावसकर (अंध-दिव्यांग) महिलेवर झालेला अन्याय दूर करण्यास कोणी संघटनेचे नेते पुढाकार घेवून न्याय मिळवून देतील काय???  आणि आपल्या माणूसकीचे दर्शन घडवून आपली संवेदना जागृत ठेवतील काय???  


       आपला विश्वासू



    वसंत शामराव उटीकर,

   सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक,      

  भारतीय एक सजग नागरिक,    

      भायखळा, मुंबई. 

भ्र. ध्व. क्र.९३२४५६१५९१.

     दि. ०२ जून २०२५.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या