कवी सुभाष राघू आढाव यांची मुंबई जिल्हा संघटक पदी नियुक्ती



मुंबई : भारतीय सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनी ( रजि.) या संस्थेची राज्यस्तरीय बैठक चेंबूर येथे उत्साहात लोकशाहिर वामनराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदरहू बैठकीत कवी सुभाष राघू आढाव यांची भारतीय  सम्यक क्रांती लोककला प्रबोधिनीच्या मुंबई जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. 


     सदरहू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर वामनराव घोरपडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भिमशाहिर संभाजी भोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय रिपब्लिकन  पक्ष शिवशक्ती  भिमशक्तिचे राष्ट्रीय  अध्यक्ष भारत वाघमारे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  परशुराम वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .   बैठकीचे सूत्रसंचालन भिमशाहिर संभाजी भोरे यांनी केले. 


    कवी सुभाष राघू आढाव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ह्या निवडीबद्दल कवी सुभाष राघू आढाव यांचे कवी बी.अनिल, साहित्यिक किशोर कासारे, कवी श्याम भालेराव, कवी सोपान नगराळे, नंदिनी संख्ये, डॉ.विजय मोरे , एंजल वैशू , राजकुमार सुर्वे , डॉ .एम.डी.इंगोले यांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या