जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये जागतिक योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस मोठ्या उत्साहात साजरा


.




      संगीत आणि योग दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत.आणि योगायोग हाच की दोन्ही जागतिक दिवस हे एकाच दिवशी म्हणजेच 21 जून रोजीच साजरे केले जातात.

     जे एम एफ संस्थे अंतर्गत जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय, वंदे मातरम् पदवी महाविद्यालय मध्ये  सकाळ आणि दुपारच्या सत्रात  शिशु विहार ते पदवी पर्यंतच्या हजारो विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिवस साजरा केला. 


       संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे, संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, इतर पदाधिकारी तसेच प्रमुख पाहुणे डॉ.निखिल शासने , डॉ.दिलीप मनोत ,  योग संचालक श्रीपाल मेहता, रंजना निकम यांनी सरस्वती व योग महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग प्रदर्शनास सुरुवात केली.

        नियमित योग करणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे , आपले शरीर हे परमेश्वराने आपल्याला दिलेली संपत्ती आहे, ही संपत्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक योगा करणे आवश्यक आहे, केवळ आजच्या एका दिवशीच योगा करून स्वास्थ टिकणार नाही तर रोजच वेळ काढून योगा करणे हे फायद्याचे आहे ,असे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

       उपस्थित योग प्रशिक्षकांनी योगाचे  महत्व सांगून सर्व विद्यार्थी ,शिक्षकांना योगाचे धडे दिले.

     जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने विद्यार्थीनी गायन, वादन सादर केले.


     भावनिक, शारीरिक, आणि मानसिक आरोग्यासाठी  " संगीतोपचार "  पद्धत किती महत्वपूर्ण ठरते , तर संगीतामधले सात सूर घेऊन आपले आयुष्य संगीतमय होऊन जाते आणि हाच जगण्याचा निखळ आनंद म्हणजेच सप्तसुरांची  गुंफण होय, असे सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर डॉ.निखिल शासने यांनी संगीतोपचार पद्धतीने योगा कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक  संगीताच्या तालावर  दाखवले व सर्व विद्यार्थी शिक्षकांनी देखील नृत्य करून आनंद घेतला.शारीरिक प्रशिक्षक  श्री.रमेश वागे, सौ.वैशाली शिंदे यांनी देखील योगा प्रात्यक्षिके करून दाखवली.

    मनावरचा आणि शारीरिक ताण हलका करण्यासाठी रोज  योगा करणे आणि संगीत ऐकणे , गुणगुणने या सारखे शक्तिवर्धक औषध कुठेच नाही असे प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उपचार पद्धतीमध्ये नमूद केले.

मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये उत्साहात योगा आणि संगीत दिवस पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या