जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांच्या आगमनाने आनंदी आनंद गडे, सर्वत्र नादावले सनई चौघडे..व वडील *Father's Day पालक दिवस साजरा केला



   उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर येणारा जून महिना म्हणजे सुखद सरींचा महिना त्यातच शाळा सुरू होणारा शाळेचा पाहिला दिवस म्हणजे आनंदाची पर्वणीच होय.



     असाव आनंदाचा दिवस घेऊन शाळेच्या पहिल्या दिवशी हजर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे, सचिव डॉ प्रेरणा कोल्हे, मुख्याध्यापक व इतर पदाधिकारी यांनी फुलांच्या वर्षावात व पायघड्या घालून सनई चौघडे लावून स्वागत केले.



      जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा व जन गण मन विद्यामंदिर शाळेतील शिशु विहार ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे व वंदे मातरम महाविद्यालय विद्यार्थी यांचे जल्लोषात स्वागत झाले.





      कलात्मक शिक्षिका सपना   येन्नम , दीपा तांबे, स्नेहा डोळे व नरेश पिसाट,  यांनी सुंदर रीत्या हस्तकलेने स्वागत कक्ष सजावट केला , व इतर सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. सर्व छोट्या मोठ्या वर्गातल्या मुलांचे आगमन होताच सर्व शिक्षकांनी टाळ्या वाजवून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले तर संस्थेच्या संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना ओवाळले . त्यावेळी मुख्याध्यापिका, उप मुख्याध्यापिका व सर्वांनी मिळून मुलांना हाताला धरून वर्गात प्रवेश केला.



     संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे यांनी देखील पुष्प वर्षाव करून सर्वांचे स्वागत केले. शाळा हे एक मंदिर आहे आणि हे सर्व विद्यार्थी म्हणजे या मंदिरातील देवता आहेत.विद्येची देवता सरस्वती, बुद्धीचा दाता गणपती बाप्पा अशा या देवतांचे रूप म्हणजे ही छोटी मुले असे उद्गार संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी काढले तर उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेऊन आलेल्या सर्व मुलांनी असाच आनंद उत्साह वर्षभर टिकवून ठेवा असे सांगून 15 जून हा Father's Day वडिल, 12 May Mother's Day व 1 june पालक दिवस पालकांचा दिवस यांची आठवण करून सर्व मुलानी  आपल्या आई वडीला साठी Greetings बनविले व Jmf संस्थेने सर्वांना चॉकलेट दिले तर त्यांच्या  घरात  जेवढे काही सदस्य आहेत तेवढे चॉकलेट विद्यार्थ्यांना दिले. अशा प्रकारे नवीन आगमना सोबत पालक दिवस पण साजरा करण्यात आला. 



     मुलांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद बघून संस्थापिका सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी देखील मुलांना जवळ घेऊन आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले, तुम्हा सर्व मुलांचे आनंदी चेहरे बघून बालपण हे कधीच संपू नये असे वाटते आणि शिक्षण घेऊन मोठे होऊन असेच बाल मनाने आनंदाने जगा असे उद्गार डॉ प्रेरणा कोल्हे यांनी काढले .

    जन गण मन इंग्लिश शाळा आणि विद्यामंदिर माध्यमातील सर्व शिक्षक वर्गाने मुलांचे स्वागत करून अध्यापनास सुरुवात केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या