कवी संतोष सावंत हीच एक संस्था असून ते खरे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.




(१ जून यांच्या या वाढदिवस निमित्ताने खास लेख)

कवी संतोष सावंत यांच्या १ जून या वाढदिवस निमित्ताने 
त्यांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा!
\



जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावातील एका निसर्गरम्य खेडेगावात जन्मलेले बालक म्हणजे कवी संतोष गोपाळ सावंत. त्यांनी आपले कलागुण व विविध क्षेत्रात आपली चतुराई कला कौशल्य खरोखरच प्रेक्षकांना आज प्रत्यक्षात दाखवत आहेत. 


बालपणापासून शाळेत अगदी दुसरी तिसरी पासूनच त्यांना कविता लिहिणे जमत असे. त्यावेळी शब्द भंडार जरी कमी असला तरी यमक जुळून कविता करणे, हे त्यांना बऱ्यापैकी जमत असे. लेख लिहिणे, भजन, गायन आणि काव्यलेखन करणे याचे एक जणू काही व्यसनच लागलेले आहे.प्रत्येक दिवशी काहीतरी छोटे मोठे लिखाण हातून होत रहावे.कविता, चारोळी यांची रचना करत रहावी. असा नित्यनेम त्यांचा ठरलेला असतो.


 संतोष सावंत हीच एक संस्था आहे. 


कवी,पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्य अशी विविध कामगिरी पाहिल्या नंतर संतोष सावंत यांच्या घरी जाऊन अजून प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच त्यांनी डोंबिवली पूर्व येथे राहणारे प्रख्यात नामांकित असलेले पहाडी आवाजाचे लोकशाहीर चंदू भरडकर यांनी  असे दहा वर्षापूर्वी उदगार काढले होते की, संतोष सावंत हीच एक संस्था आहे. 


संगीत आणि साहित्य क्षेत्रातील काही सांगायचे झाल्यास कवी संतोष गोपाळ सावंत यांनी शंभर हून अधिक कविता लीहिल्या आहेत. त्यात भक्तिगीत, लोकगीत, निसर्ग कविता यांचा त्यात जास्त समावेश आहे. त्यांचे ms music nardave या you tub Chanel वर आता पर्यंत त्यांची ध्वनिमुद्रण झालेली 50 हून अधिक स्वरचित गीते त्यांनी स्वतः व इतर गायकांनीही गायलेली आहेत. भक्तीगीते गणपती गीते अशी त्यांनी गायलेली आहेत.

ते स्वतः गीतरचना करून स्वतः चाल लावून गीत गायन करतात.या क्षेत्रांत ते सागोसूत हरिसंतोष या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत.


तसेच त्यांच्या संतोष प्रकाशन (रजिस्टर) आणि नवचैतन्य सामाजिक विकास संस्था (रजिस्टर)  यांच्या माध्यमातून नवोदित लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

 


सामाजिक क्षेत्रातील कामगिरी बद्धल सांगायचे झाल्यास नवचैतन्य सामाजिक विकास संस्थापक अध्यक्ष लोकसत्यवाणी न्यूज चॅनेल संपादक साप्ताहिक "स्नेहसंयोग" संपादक आहेत. संस्थेच्या वतीने गेली १५ वर्षे  समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करतात. आरोग्य शिबिरही राबवली जातात. 

सातत्याने साप्ताहिक स्नेहसंयोग मधून व लोकसत्यवाणी न्यूज चॅनल च्या माध्यमातून लोकहितकारक अशा बातम्या देऊन समाज प्रबोधन करतात. अनेक लोकांच्या मुलाखती घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.अनेक कलाकारांना त्यांनी प्रसिद्धी देऊन प्रकाश झोतात आणलेले आहे.



त्यांनी दोन नाटके, व दोन एकांकिका लिहिल्या आहेत. स्वतः अभिनेता, दिग्दर्शक, आणि निर्माते म्हणून ही कामगिरी पार पाडत आहेत. दशावतार नाटकामध्ये स्त्री ची भूमिका पण उत्कृष्ट पार पाडतात. अशा कितीतरी त्यांच्या बाबतीतले गोष्टी आहेत. अगदी मनमिळावू स्वभाव आणि सर्वांचे चांगले व्हावे अशी त्यांची नेहमीच मनात इच्छा असते. 




गेली २५ वर्षे सुबक आरती संग्रह छापून गणेश भक्तांना मोफत वितरण करीत असतात.तसेच स्नेहसंयोग ही
दिनदर्शिका सुद्धा दरवर्षी प्रकाशित करतात.






       गेल्या पंचवीस वर्षांपासून नरडवे धरण चालू आहे. पण अनेक लोकांचे काही प्रश्न सुटेनात. म्हणून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून १५ जानेवारी २०१८ ला एक लेख लिहिला. लेखाचे शीर्षक होते. "एवढे आपण षंढ झालो आहोत का?" व्हॉट्सॲप वर वायरल ही केला. त्या लेखातून अनेकाना प्रेरणा मिळाल्या. त्यानंतर सर्व मुंबईतील गावकरी एकत्रित आणण्यासाठी सुरेश सहदेव ढवळ सारखे त्यांना खमके व्यक्तिमत्व त्यांच्या सोबतीला मिळाले. प्रत्येक वाडीतून एक एक असा चांगले नेतृत्व करणारे लोक निवडली. त्यातले अजून ही काही ईमानदार लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत.आमचे ज्येष्ठ असे असणारे श्री मधुकर पालव श्री.जगदीश पवार,उदय मेस्त्री, यशवंत सावंत असे मुंबईतून अनेक लोक त्यांना साथीला मिळाले.त्यानंतर त्या सर्वांनी जोरदार अशी भरारी घेतली. आणि लोकांचे प्रश्न सुटण्यासाठी आता अनेकांचे सहकार्य घेऊन अजूनही ते सातत्याने लढत आहेत.


साहित्य क्षेत्र आणि कला क्षेत्राबरोबर ही सामाजिक बांधीलकी जपत आहेत.

      असे हे हरहुन्नरी कवी संतोष सावंत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्ती प्रमाणे सदोदित समाज हितासाठी वाहून घेतलेले असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. यात यत्किंचितही शंका नाही.


*******************************************************************

( कवी संतोष सावंत यांच्या १ जून या वाढदिवस निमित्ताने खास लेख)
त्यांना भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा!

 श्री.यशवंत सावंत (दुर्गानगर)

*******************************************************************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या