अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.





  नवी मुंबई :  नेरुळ येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा  ३७ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ रोजी नेरुळ पूर्व मधील शाखेतील प्रांगणात मोठ्या  उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे प्रशासक सत्यप्रकाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रेमनाथ सालियन, प्रशासकीय समिती सदस्य वेंकटेश हेगडे, महा व्यवस्थापक तुषार साळस्तेकर, 

क्लष्टर प्रमुख आनंद किनरे, विपणन व्यवस्थापक मधुसूदन राजपूरकर, नेरुळ शाखेचे मुख्य व्यवस्थापक नितीन घाग, व्यवस्थापक रमेश पवार, बँक अधिकारी तसेच बँकेचा ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रसंगी एक महिला खातेदार श्रीमती सुषमा चौधरी यांनी त्यादिवशी बारा लाख रुपये मुदत ठेवीत ठेवले म्हणून त्यांचा मुदत ठेवीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


या सुंदर सोहळ्याची  सुरुवात अभ्युदय बँकेच्या प्रार्थना गीताने झाली. यानंतर ठेवीदार व खातेदार तसेच प्रमुख अधिकारी वर्ग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 


अभ्युदय म्हणजे उन्नती,  प्रेरणा  असे प्रतिपादन करत बँकेचे खातेधारक श्री. खातू यांनी आर्थिक दुर्बल गटांना कर्ज देण्यात यावे, मायक्रो फायनान्सकडे लक्ष पुरवावे असे सुचविले.


 रिझर्व बँकेचे  सेवानिवृत्त अधिकारी  विकास साठे यांनी सांगितले की ग्राहक हा राजा आहे त्यांना चांगल्या बँकिंग सेवा देणे गरजेचे आहे,  तरच त्याचे बँकेशी नाते दृढ होऊन बँकिंग व्यवसाय वाढू शकतो. बँकिंग व्यवसाय करताना रिझर्व बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केलं तर बँकेची आर्थिक स्थिती सुदृढ राहू शकते, बँकेची प्रगती होऊ शकते.



उपस्थितांशी संवाद साधताना बँकेचे   प्रेमनाथ सालियन यांनी अभ्युदय बँकेचा लेखाजोखा मांडला. बँकेचे प्रशासक सत्यप्रकाश पाठक यांनी बँक अडचणीत होती, मात्र आता तिची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे प्रतिपादन केले. सुभाष हांडे देशमुख यांनी आपल्या भाषणात बँकेचा कर्मचारी वर्ग ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवितो म्हणूनच बँकेची स्थिती चांगली झाली आहे आणि चांगलीच राहील असे आश्वासक उद्गगार काढले. प्रसंगी राजेसाहेब राऊत यांनीही आपले अनुभव व्यक्त केले. 


संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा शिराळकर यांनी नेटके केले. नितीन घाग यांनी उपस्थित ग्राहकांचे व अधिकारी वर्गांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

--------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या