सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजन
---------------------------------------------------------------------------
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख होण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा सर्वजनास माहिती व्हावी या उद्देशाने माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व श्री विकास खारगे, माननीय मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 प्रयोगसिध्द कलांची प्रशिक्षण शिबीरे व सत्रे आयोजन करण्यात येत आहे. किर्तन, शाहिरी, तमाशा, नाट्य व बालनाट्य या व्यतिरिक्त विधीनाट्य, खडीगंमत, दशावतार, लावणी व झाडीपट्टी या प्रयोगसिध्द कलांचा समावेश करण्यात आला आहे. दशावतार ही महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील एक पारंपारिक लोकनाट्य शैली आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूच्या दहा अवतारांची कथा सादर केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, कणकवली आणि गोव्यातील काही भागांमध्ये ही कला विशेषतः लोकप्रिय आहे. मुंबई स्थित कलाप्रेमी मध्ये या कलचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या कार्यशाळेतून देण्यात येणार आहे.
दशावतार या रामायण व महाभारत यावर आधारित विविध घटना पात्र यांच्या परिचय देणारे तसेच कला, रंगभूषा, वेशभूषा, नृत्य, महिला पात्र, शब्द फेक, ध्वनीतील चढ उत्तार, सादरीकरण शिबीर /कार्यशाळा आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यशाळा दिनांक 19 मार्च ते 28 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 20 प्रशिक्षनार्थी ची निवड होणार आहे. या कलेचे जतन व संवर्धन व्हावे य उद्देशाने शासनाचा स्तुत्य उपक्रम आपल्या जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे.
ही प्रयोगसिद्ध कला कार्यशाळा विनामूल्य आहे. सहभागी प्रशिक्षनार्थीना शासनाकडील प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागी समन्वयक,प्रशिक्षनार्थी, प्रशिक्षक या सर्वांना विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य यांनी या कार्यशाळेकरिता शुभेच्छा दिल्या आहे.
0 टिप्पण्या