डोंबिवली पश्चिम चिंचोड्याचा पाडा येथे शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी महिला दिना निमित्त वीर शिवशंभु संघटने तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचे उदघाटन सौं. सीमा सुरेश परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देत करण्यात आले!!
या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी उत्तम वरपडे - पाटील हे आहेत.
यावेळी संघटनेच्या खजिनदार आणि कार्यक्रमाच्या सर्वेसर्वा आणि प्रमुख संयोजक मुख्य खजिनदार सौ श्रावणी ताई अनभवणे महाराष्ट्र राज्य, यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचा हा कार्यक्रम उत्तमरित्या सोहळा संपन्न झाला.
संघटनेचे शहराध्यक्ष .सौ. सीमा सुरेश परदेशी, शहर उपाध्यक्ष सौ. संयोगिता संभाजी गुरव, सचिव सौ वर्षा प्रणय गायकवाड, कार्याध्यक्ष सौ मयुरी घाडीगावकर, कार्यकारी सरचिटणीस सौ. नंदा दिनेश मोरे, कोषाध्यक्ष संचिता राणे, प्रसिद्धीप्रमुख/मीडिया प्रमुख सौ सोनल सुर्वे, संपर्कप्रमुख सौ रमा कसबे, सहसचिव सौ. मयुरी वाडेकर
आणि ईतर महत्वाच्या पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या!!!
यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.सौ.अक्षरा ताई पटेल समाजसेविका कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या पत्नी सौ.संजीवनी ताई म्हात्रे,सौ आरती ताई मोकल, माजी महापौर सौ.मृणाल ताई यदनेश्वर संपर्क प्रमुख सौ सुप्रियाताई चव्हाण महिला संघटिका डोंबिवली यांना ही शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दृष्ट लागावा असा हा अभूतपूर्व कार्यक्रम झाला, ज्यात समाजातील कर्तृत्ववान,प्रतिष्ठित महिलांचा सन्मान, आणि महिलांसाठी विविध खेळ, बक्षिसे आणि लकी ड्रॉ च्या द्वारे 12 भाग्यवंत महिलांना *पैठणी साड्या*बक्षीसरूपात वाटण्यात आल्या!!
या कार्यक्रमासाठी संघटनेस नगरसेविका कविता विकास म्हात्रे यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू चव्हाण यांनी केले.
हा कार्यक्रम संपूर्ण पणे फक्त आणि फक्त महिलांनी महिलांसाठी स्वतःच्या ताकदीवर आणि ईच्छाशक्तीवर यशस्वी करून दाखवला.
0 टिप्पण्या