पातोंडा येथे,अहिराणी गौरव दिन व श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज जयंती दिन उत्साहात साजरा




 मा. प्राचार्य   मगन सूर्यवंशी - अध्यक्ष, कोकण प्रांत अहिराणी भाषा संवर्धन समिती -यांच्या सहकार्याने , व प्रा. श्री प्रदीप शिंगणे  सर तथा श्री दत्त विद्यामंदिर पातोंडा यांच्या सहमतीने "अहिराणी गौरव दिन, जागतिक महिला दिन व श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज जयंती दिन "असा त्रिवेणी संगम साधून सुंदर कार्यक्रम पार पडला.

   प्राचार्य प्रदीप शिंगाने  सर यांनी अहिराणीतून प्रस्तावना केली. श्री प्रदीप लोहारे सर, सौ छाया संदानशिव ताई, सौ सुनंदा पारधी ताई यांनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त केले,तसेच कुमारी धनश्री कुंभार, हर्षदा पाटील या विद्यार्थिनींनी  महिला दिनानिमित्त सुंदर भाषण केले, कार्यक्रमास लाभलेले  माजी डी वाय एस पी  श्री पी एल संदानशीव साहेब यांनी असखलित अहिराणी भाषेत  अहिराणी चे गुणगान केले. प्राचार्य मगन सूर्यवंशी सरांनी  सयाजीराव गायकवाड महाराज यांचा समग्र जीवनपट  संक्षिप्त  शब्दात पूर्णपणे  अहिराणी भाषेत  मांडून ते किती महान राजे होऊन गेले  हे अधोरेखित केले.


 शेवटी" माले इचार पडस " ही स्वलिखित अहिराणी भाषेतील कविता म्हणून व अहिराणी बोला, लिखा, वाचा, आयका असा संदेश देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री एम बी पाटील सर, बी पी मोरे सर,  श्री अतुल पवार व श्री मुरलीधर बिरारी यांनी मोलाचे  सहकार्य केले..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या