दत्ताराम आंब्रे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व



नवी मुंबईतील नेरुळ मधील ज्येष्ठ नागरिक संघ ही संस्था समाज हिताच्या दृष्टीने तसेच ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देणारी एक प्रातिनिधीक संस्था ठरलेली आहे.  संघाची स्वतःची स्वयंपूर्ण अशी तीन मजली इमारत असून समाज उपयोगी उपक्रमाबरोबरच ज्येष्ठांसाठी वैद्यकीय सेवा, ग्रंथालय यांचीही व्यवस्था आहे. ज्येष्ठांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातात, त्यामुळे साहित्यिकांना एक व्यासपीठ तर उपलब्ध झाले आहेच त्याचबरोबर संभाषण कौशल्य,  नृत्य,  करा ओके द्वारे गाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमातून अनेक ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव मिळून ते नावा रुपाला आले आहेत. 


या उपक्रमातीलच एक प्रमुख भाग म्हणजे संघाचा  गुरुवारी होणारा मन की बात  हा कार्यक्रम होय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक संभाषण पटू तयार होत आहेत.  झालेले आहेत. यातीलच एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दत्ताराम आंब्रे हे होत. कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन अशा प्रकारच्या सर्व कामात निष्णात असलेले दत्ताराम आंब्रे कधीही व्यासपीठावर उभे राहिले नव्हते. बोलण्याची सवय नसलेले दत्ताराम आंब्रे यांनी दिनांक २ जानेवारी रोजी झालेल्या संघाच्या सभागृहात मन की बात या कार्यक्रमात,  व्यासपीठावरून उपस्थित जेष्ठांशी संवाद साधला आणि ज्येष्ठांची वाहवा मिळवली. त्यांना विषय दिला होता २०२४ या वर्षाने जेष्ठ नागरिक संघाला काय दिले व आभार कोणाचे मानायचे. श्री. दत्ताराम आंब्रे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने आपल्या मनोगतात विषयांचे सखोल विवेचन केले.  त्यांचे मनोगत त्यांच्याच शब्दात....


२ जानेवारी रोजी झालेल्या मन की बात या कार्यक्रमात माझा विषय होता, २०२४ या वर्षाने ज्येष्ठ नागरीक संघाला काय दिले. अध्यक्ष श्री. अरविंद वाळवेकर साहेब आणि सर्व कार्यकारीणी मंडळाच्या प्रयत्नामुळे दर गुरुवारी वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित झाले. त्यातून मला प्रेरणा तर मिळालीच त्याचबरोबर सभासदांनाही नवी उर्जा मिळाली. तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक माहीती मिळाली. ज्येष्ठ नागरिक भवन मधील गणेश हॉल म्हणजे उर्जेचे एक ठिकाण आहे. गुरुवारी कार्यक्रमास आलेला प्रत्येक सभासद नवी उर्जा घेवून जातो आणि पुढील गुरुवार केव्हा येतो, याची वाट पहात आसतो. या वर्षी कार्यकारिणींने वर्धापन दिनानिमित्त सभासदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजीत केल्या होत्या. त्या स्पर्धेत अनेक नविन कलाकार आणि खेळाडू मिळाले,  की जे यापुढे जेष्ठ नागरिक नेरुळ संघाचे नाव रोषण करतील. शेवटी आपण आभार कोणाचे मानतो यावर बोललो. आई वडील, गुरुजन, सहकारी आणि रात्री सात नंतर भेटणाऱ्या मित्रांचे आपण खूप खूप आभार मानतो पण आपण आपल्या शरीराचे आभार मानायला विसरतो. आपल्या शरीरातील सर्व अवयवांचे दिवसातून एकदा तरी आभार मानावेत. असे मनोगतात सांगितले.


आपल्या मनोगतात, उदाहरणा दाखल दत्ताराम आंब्रे विशद करतात की, नवी मुंबई माहानगर पालिकेने नुकत्याच विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेत आपल्या संघातील सभासदांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने भाग घेऊन प्रथम, द्वीतीय,  तृतीय अशी आठ ते दहा पारितोषके मिळवली. हा मागच्या वर्षांने  संघाच्या कार्याचा केलेला गौरवच आहे असे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.


सहाजिकच झालेल्या कार्यक्रमात संघाने सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मीरा जोशी यांच्या हस्ते दत्ताराम आंब्रे यांचा यथोचित सत्कार केला. हा सत्कार माझा नसून संघाचा आहे. संघाने प्रत्येक कार्यक्रमात मला दिलेल्या संधीने, प्रेरणेने,  प्रोत्साहनाने मी तयार झालो.  माझ्यात क्षमता आली. असे दत्ताराम आंब्रे विनयाने सांगतात.


सुभाष हांडे देशमुख

         नेरुळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या