मुंबई ( प्रतिनिधी) भारतातील पहिल्या शिक्षिका ,मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 जयंती विक्रोळी टागोर नगर व कन्नमवार नगर येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत असणाऱ्या विक्रोळी भांडुप नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका ,मदतनीस तसेच अंगणवाडीतील मुले ,मुली पालक, स्तनपान माता व गरोदर स्त्रिया किशोरवयीन मुली तसेच मनपाच्या शाळेतील शिक्षक व विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आल्याचे अंगणवाडी सेविका व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष वनिता प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
सदर कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला असून अंगणवाडी सेविका वनिता पालकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी सर्व उपस्थिताना लाडू वाटप करण्यात आले असून तक्षशिला बुद्ध विहार परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या घराच्या उंबरठ्यावर ज्ञानाचा एक दिवा लावून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले .
सदर कार्यक्रमाला कन्नमवार नगर व टागोर नगर विभागातील सेक्टर एक मधील सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम प्रत्येक अंगणवाडी केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्याचे अंगणवाडी सेविकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..
शेवटी कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



0 टिप्पण्या