मुक्तपत्रकार श्री. परशुराम नेहे यांचा आज ७ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवस असून नीलपुष्प साहित्य मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त श्री. परशुराम नेहे यांचे हार्दिक अभिनंदन



नीलपुष्प साहित्य मंडळाचे सदस्य, कवी, लेखक, सूत्रसंचालक, निवेदक, सामाजिक कार्यकर्ते, मुक्तपत्रकार श्री. परशुराम नेहे यांचा आज ७ जानेवारी २०२५ रोजी वाढदिवस असून त्यांनी वयाची ७३ वर्षे पूर्ण केली असून ७४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. नीलपुष्प साहित्य मंडळातर्फे वाढदिवसानिमित्त श्री. परशुराम नेहे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या जीवनाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!👏👏🌹


अकोले जिल्ह्यातील आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले श्री. परशुराम नेहे यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून समाजमनावर उमटवलेला ठसा वाखाणण्याजोगा आहे. सामाजिक परिवर्तनाच्या मोहिमेत सतत कार्यरत असलेले, अनेक पुरस्कार लाभलेले तसेच श्री दत्त ज्येष्ठ नागरिक संघ, ठाणे; श्रमिक नागरिक पतसंस्था गुणवंत कामगार मंडळ, ठाणे; नक्षत्रांचे देणे काव्यमंच, पुणे; अष्टविनायक सेवा संस्था, ठाणे; अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मराठी साहित्य मंडळ, मुंबई; लोकसारथी समाज प्रबोधन अशा विविध संस्थांमध्ये ते आजही उत्साहाने कार्यरत आहेत. नक्षत्राचे देणे या काव्यमंचचे ते ठाणे येथील विभागप्रमुख आहेत. अनेक कविता स्पर्धांचे त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ‘विज्ञानऋषी’ या डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेल्या कवितेचा राष्ट्रपती भवनात सन्मान झाला आहे. 


क्रॉम्प्टन ग्रीव्ह्जमध्ये नोकरीत असताना साहित्य, सहकार, ढ कामगार अशा विविध क्षेत्रात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली आहे. तसेच संस्कार, आध्यात्म शास्त्र या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. कंपनीतील संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, नेतृत्व विकास कामगार प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या संयोजनात ते नेहमीच अग्रभागी असत. 


त्यांनी लिहिलेल्या लेखांना साहित्य संमेलनात गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांना लेखांना, घोषवाक्यांना पुरस्कार लाभले आहेत. ‘आयटक’ या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे नेतृत्व केले आहे. आकाशवाणीवरील कामगार सभा या कार्यक्रमात त्यांची मुलाखत प्रसारित झाली आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन राज्यसरकारने त्यांना गुणवंत कामगार या पुरस्काराने गौरविले. 


अनेकांच्या उपयोगी पडून नेहे सरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवारसाहेब, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदेसाहेब, महापौर मा. नरेश म्हस्केसाहेब, आमदार निरंजन डावखरेसाहेब यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव झाला आहे. गतवर्षी अहिल्याबाई जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


कै. डॉ. नारायण तांबे यांच्याबद्दलची एक आठवण सांगताना ते म्हणतात, “एका कार्यक्रमात मी मुक्त पत्रकार म्हणून  पहिल्या रांगेत बसलो होतो. तांबे साहेब मागे हातात गुच्छ घेउन ऊभे होते. संमेलनाध्यक्ष सबनीस साहेबांचा सत्कार करावयाचा होता. मी त्यांना नावाने ओळखत होतो. मी त्यांना हाक मारुन बोलावले. बसायला जागा दिली. सत्कारासाठी मदत केली, तेव्हा त्यांनी माझा परिचय करुन घेतला व मला ह्रदयात कायमचे स्थान दिले. नेहमी दुसर्‍याला मदत करुन मोठे करण्याचा माझा स्वभाव आहे. त्यामुळे पुढे त्यांनी मला व कवी  लक्ष्मण माळींंना  नीलपुष्पचे जनसंर्पक  प्रमुख बनवले. माळी या घटनेचे साक्षीदार आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे सूत्रसंचालन, निवेदन करण्याचे भाग्य मला लाभले, ज्याच्या सीडी आजही माझ्याकडे आहेत. त्यांनी संस्थेत निर्माण केलेल्या जिव्हाळ्यापोटीच, त्याच्यावरील प्रेमापोटीच मी आजही नीलपुष्पशी जोडलेलो आहे आणि त्याचा सुगंध माझ्या जीवनात दरवळतो आहे.” 


साहित्य क्षेत्रातील प्रगतीचे सारे श्रेय ते नीलपुष्प साहित्य मंडळाला देतात. जसं नाटकाच्या पहिल्या अंकात अंदाज घेत चाचपडत पुढे जाणारं कथानक दुसऱ्या अंकात आशयावर पकड घेत तिसऱ्या अंकात परिपूर्णतेचा कळस गाठतं, त्याचप्रमाणे नीलपुष मंडळ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवासाचा पहिला अंक आहे आणि तोच साहित्याचा भक्कम पाया असल्यामुळे या क्षेत्रात पुढे विविध संस्थांच्या माध्यमातून ते भरारी घेऊ शकले, असे ते प्रांजळपणे सांगतात. तसेच “नीलपुष्प मंडळाला माझ्या जीवनात अमूल्य स्थान आहे,” असे ते म्हणतात. 


सतत हसतमुख, कार्यशील असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, अनमोल रत्न नीलपुष्पच्या खजिन्यात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. श्री. परशुराम नेहे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांचे पुढील आयुष्य सुखी, समाधानी, निरामय, आरोग्यदायी, आनंदमयी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!🙏🏻💐


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


सौ. नंदा कोकाटे

नीलपुष्प साहित्य मंडळ, ठाणे जिल्हा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या