डॉ. संजय नागावकर शिक्षण क्षेत्र पुरस्काराने सन्मानित                   


 साई सेवक प्रतिष्ठान व सामाजिक संस्था भिवंडी आयोजित भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये डॉ.संजय हनुमान नागावकर, रा.पिंपळास यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब तसेच माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेब, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब, विलास पाटील साहेब, विशुभाऊ म्हात्रे साहेब तसेच इतर मान्यवरांच्या शुभहस्ते डॉक्टर संजय हनुमान नागावकर यांना भिवंडी तालुक्यातील टॉप टेन व्यक्तींपैकी शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना शिक्षण क्षेत्र पुरस्कार देऊन भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये सन्मानित करण्यात आले .हा पुरस्कार त्यांच्यासाठीचा आतापर्यंतच्या पुरस्कारापेक्षा सर्वात मोठा पुरस्कार असल्यामुळे त्यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन तसेच त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे. सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड माननीय डॉक्टर श्री भगवान ठाकूर व पुरस्कार समितीचे इतर पदाधिकारी यांनी त्यांचा प्रस्ताव पाहून, मुलाखती द्वारे निवड केली व त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान भिवंडी आगरी महोत्सव 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आदरणीय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तरे सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या