मुंबई उपनगर जिल्हा हौशी शरीरसौष्ठव अजिंक्यपद 'मुंबई श्री' स्पर्धा उत्साहात




 मुंबई उपनगर जिल्हा हौशी शरीरसौष्ठव अजिंक्यपद 'मुंबई श्री' स्पर्धा उत्साहात


मुंबई- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित बृहन्मुंबई उपनगर जिल्हा हौशी  शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा २०२५ 'मुंबई श्री' नुकत्याच चेंबूरच्या घाटले गावदेवी मैदानात उत्साहात संपन्न झाली.शिवसेना आमदार तुकाराम काते आणि तुषार काते  यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. 


या शानदार,पिळदार स्पर्धेचे उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश  कदम यांच्याहस्ते करण्यात आले.या स्पर्धेमध्ये १) ज्युनियर मुंबई उपनगर श्री  (अंतिम किताब विजेता), जनेश सदानंद पुजारी  (नेरवणकर जिमको),२)मुंबई उपनगर श्रीमान  ४९ वर्षांखालील (अंतिम किताब विजेता)- श्री प्रभु गुरुस्वामी पुलावर (प्रेरणा जिमको,चेंबूर),३) मुंबई उपनगर मेन्स फिजिक्स (अंतिम किताब विजेता)- आरामान हैदर अलीम सैयद (सुहास किल्लेकाचेवर, ४)मुंबई उपनगर श्री (अंतिम किताब विजेता)- स्वप्निल अंकुश तेरवणकर (तेरवणकर जिमको,घाटकोपर) यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेमध्ये २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.त्यामधून  हे चार अंतिम किताब विजेते झाले.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आमदार तुकाराम काते,तुषार काते,  जायंट ग्रुपच्या ललिता वासन,विभागप्रमुख अविनाश राणे,उपविभाग प्रमुख रविंद्र महाडिक,भाजपचे नेते अनिल ठाकूर,ज्येष्ठ पत्रकार शंकर कडव तसेच मुंबई व मुंबई उपनगरची पंच मंडळी, कार्यकर्ते तसेच उपनगर जिल्हा सचिव हेमंत पाटील, मुंबई जिल्हा सचिव नंदकुमार तावडे, आयएफबीएफचे अध्यक्ष सुरेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या