श्री पावणा देवी मंदिर नूतनीकरण (जिर्णोद्धार) सोहळा संपन्न,






कणकवली तालुक्यातील दारोंम गावातील पावणादेवी मंदिराचे  श्री पावणा देवी मंदिर नूतनीकरण (जिर्णोद्धार) सोहळा , बुधवार दिनांक  29 जानेवारी  ते 31 जानेवारी 2025 दरम्यान  संपन्न झाला. 

    🏵️🏵️ कार्यक्रम 🏵️🏵️

1) दिनांक 29 जानेवारी 2025   कलश मिरवणूक त्यानिमित्त गावात (वाडीवार) देवीच्या कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

2) दिनांक 30 जानेवारी 2025 ग्राम देव-देवतांना वंदन करून श्रीफळ अर्पण करण्यात आले. सकाळी 8.00 वाजता प्रायश्चित्त संकल्प, गणेश पूजन, नांदी श्राध्दांत पुण्याहवाचन, ग्रह मंडल देवता स्थापन पूजन आणि जलाधीवास कलश स्नान, महाभोजन इ. विधी पार पडल्या.



3) दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी शापित देवतांची शोडशोपचार पूजन, होमहवन, कलश प्राणप्रतिष्ठा रोहन पूर्णाहुती बलिदान, अभिषेक, महाआरती, महाभोजन.

करवीर पिठाचे परम पूज्य शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्याउपस्थितीत कलशा रोहन महोत्सव पार पडला.




श्री पावना देवी मंदिर नूतनीकरण व  कलशारोहण सोहळ्याला मौजे दारुम ग्रामस्थ, पाहूणे मंडळी, मुंबईकर चाकरमानी, माहेरवाशिणी, पंचक्रोशितील भक्तगण उपस्थित होते. सांगता सोहळ्याच्या दिवशी मंदिर कलशारोहण, धार्मिकविधी, महाआरती, महाप्रसाद देवीची ओटी भरणे आणि महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला.     

      


मंदिर नूतनीकरण अध्यक्ष: श्री प्रविण प्रभाकर तळेकर 

कार्याध्यक्ष:  श्री प्रमोद नारायण तळेकर 

उपाध्यक्ष:  श्री संतोष रमाकांत तळेकर 

खजिनदार : श्री रवींद्रनाथ हरी तळेकर

देवस्थान समिती अध्यक्ष: श्री अशोक विठ्ठल तळेकर.

मुंबई मंडळ अध्यक्ष श्री मनोहर नारायण तळेकर 

धार्मिक विधी प्रमुख : श्री संजय कृष्णा तळेकर, दशरत राघो सावंत, श्री यशवंत शंकर लिंगायात, श्री विलास पांडुरंग गुरव, श्री शरद केशव गुरव, श्री रवींद्र नाना भोगले, श्री अशोक गणपत तळेकर अशी नवीन कमिटी आणि सर्व सदस्य भक्तगण यांनी सर्वांनी अंगमेहनत आर्थिक मेहनत केली. त्यामुळे सर्वांचे आभार मंदिर समितीने मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या