गांधी जयंती निमित्त जे एम एफ शिक्षण संस्थेमध्ये 'स्वच्छ्ता अभियान ' राबविण्याचे आयोजन.



            2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा  गांधी  आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय लाल बहाद्दूर शास्त्री जी यांची जयंती जे एम एफ मधुबन वातानुकुलीत दालनांत साजरी करण्यात आली. प्रतिमेची पूजा करून गांधीजींचे ' वैष्णव जन तो तेने काहिये जी...हे भजन लावून गांधीजींच्या प्रती भावना व्यक्त केल्या.

         स्वच्छ भारत , सुंदर भारत ह्या अंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचाराच्या सरणीचा प्रभाव सर्व भारतीयांवर आहे. जे एम एफ शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन शाळा, महाविद्यालय , वंदे मातरम् पदवी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यानी शाळेमध्ये स्वच्छ्ता अभियान राबविले.  भारताचे सुजाण नागरिक म्हणून जबाबदारीने सर्व विद्यार्थ्यांनी शाळा ते कोपर स्टेशन पर्यंत रस्त्यावर जाऊन साफ सफाई केली.


           आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत, महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या सारख्या आदर्श विचारवंतांचे विचार नेहमीच सर्वांना उस्फुर्त करतात.'जय जवान, जय किसान' चा नारा  लाल बहाद्दूर शास्त्री यांनी दिला. गांधी जी  आपापली कामे स्वतः करत असत असे आदर्श नेते आपल्या भारताला लाभले ,असे संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व स्वतः हातात झाडू घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला. सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी देखील डॉ राजकुमार कोल्हे यांच्याबरोबर श्रमदान केले. सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीतून भारताचा विकास होण्यास मदत होते असे सांगून डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर स्वच्छ्ता अभियानात सहभाग दर्शवला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या