एअरपोर्ट शाळेतील विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन



1 आक्टोबर , विलेपार्ले एअरपोर्ट शाळेतील प्राथमिक विभाग  व माध्यमिक विभाग यांचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन एक आक्टोबर ते सात ऑक्टोबर दरम्यान हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेन्टल येथे आयोजित केलेले आहे चित्र प्रदर्शनाचे उद्घाटक श्री अजय जोशी ( जनरल मॅनेजर(A.T.C.) एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, श्री संदीप जोशी (जॉईंट जनरल मॅनेजर  ) श्री आनंद साधू ( सेक्रेटरी सिविल एव्हिएशन स्कूल असोसिएशन)श्री. आर. सुब्रमण्यम व श्री मधुकर वाघमारे ( माजी विद्यार्थी संघटनेचे सभासद)  *श्री नेताजी चौगुले( प्राचार्य, एअरपोर्ट हायस्कूल ),सौ रेचल थांगया (मुख्याध्यापक, प्राथमिक विभाग) 


    या मान्यवरांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आपली कला अभिव्यक्ती व्यक्ती समाजापुढे मांडण्यासाठी कलाशिक्षक श्री भागवत सपकाळे सर व सौ साधना मिश्रा यांनी मार्गदर्शन केले ,विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रांची रचना केली आहे. यात निसर्गचित्रे गणपतीचे विविध रूपे, मंडला आर्ट ,वारली पेंटिंग, स्केचेस, पोट्रेट यांचा समावेश प्रदर्शनात केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या