अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा आणि तिमिरा कडून तेजाकडे नेणारा म्हणजे शिक्षक होय. दिनांक ५ सप्टेंबर म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती व हाडाचे शिक्षक डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म दिवस , तोच शिक्षक दीन म्हणून साजरा केला जातो .
जे एम एफ संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर मधे देखील शिक्षक दीन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यानी आपल्या लाडक्या शिक्षकांची भूमिका साकारली होती. लहानपणापासून च शिक्षक होण्याचे स्वप्न सर्वच मुलांचे असते, आपल्या आवडत्या शिक्षकांसारखे शिक्षक व्हावे असे वाटते आणि निरीक्षण करून शिक्षक दिनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार झाले व सर्व छोट्या मुलांना वर्गात जाऊन शिकवणे ही त्यांच्या साठी आनंदाची पर्वणीच ठरली. सर्व विषयांचे शिक्षक शिक्षिका तर अगदी शिशु विहार मधील छोटी मुले देखील संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला चे शिक्षक झाले होते.
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांचे व्यक्तिमत्त्व तर नेहमीच सर्व मुलांना प्रेरणादायी ठरते, त्यांच्या व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्वातील झलक थोडीफार तरी आपल्यामध्ये असावी असे सर्वांना वाटते ,त्यामुळे आजच्या शिक्षक दिनी संस्थापक आणि सचिव हे व्यक्तिमत्त्व साकारायला मिळाले म्हणून विद्यार्थी गर्वात होते.
संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सर्वच मुलांचे जातीने हजर राहून कौतुक केले.सर्व शिक्षकांच्या भूमिका आत्मविश्र्वास पूर्वक साकार केलेल्या विद्यार्थ्यांबरोबर कर्मचारी कक्षात बैठक घेतली व सर्वांबरोबर अल्पोपहार घेतला.
मी प्रथम एक शिक्षक आहे व नंतर जे एम एफ संस्थेचा संस्थापक आहे, आज शिक्षक म्हणून मला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान वाटतो, की विद्यार्थी दशेत असतानाही तुमच्यामध्ये आदर्श शिक्षकाचे गुण आहेत, आज तुमच्या प्रत्येकात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा दडलेली आहे, मी आशा करतो की यामधूनच भविष्य काळात भावी राष्ट्रपती , शिक्षक ,डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन नक्कीच उदयास येतील. असे प्रेरणादायी उद्गार काढून सर्वांना भेटवस्तू ,प्रशस्तीपत्रक व शुभेच्छा दिल्या.
मधुबन वातानुकुलीत दालनांत सर्व शाळा , महाविद्यालयीन शिक्षक कर्मचाऱ्यांचा शिक्षक दीन म्हणून सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. संस्थापक डॉ राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ प्रेरणा कोल्हे व मान्यवर अतिथी यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्रीमती तुळसाबाई लाकडे ह्या स्वतः हाडाच्या शिक्षिका असून डॉ .श्री व सौ कोल्हे यांच्या देखील शिक्षिका होत्या.डॉ राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा कोल्हे यांनी श्रीमती तुळसाबाई लाकडे यांचे पुष्पगुच्छ ,शाल श्रीफळ देऊन स्वागत केले तर श्रीमती तुळसाबाई यांनी दोघानाही भरभरून आशीर्वाद दिला व त्यांच्या ८९ वर्षातला प्रवासाचा एक शिक्षक म्हणून अनुभव सांगितला.
डॉ प्रेरणा कोल्हे यांनी शिक्षक कसा असावा तर , आपली तत्वे विद्यार्थ्यांवर जबरदस्तीने न थोपावता येत्या काळाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी दिलेली शिकवण म्हणजे तो खरा शिक्षक. असे सांगून शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती ही असलीच पाहिजे असे मत व्यक्त केले.
शिक्षक दिना चे औचित्य साधून उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या शिक्षकांना ' शिक्षा रत्न ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याच बरोबर सर्व शिक्षकांना कुटुंबासमवेत एक दिवसीय सहलीचे आयोजन करून कूपन देण्यात आले. वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या