*स्थानिक रहिवाशांचा शेड बांधण्यास विरोध नाही !
मुंबई- दोन दिवसांपूर्वी 'स्थानिक रहिवाशांना डावलून शेड बांधल्याने घाटले भागात वादंग' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या 'लोकसत्यवाणी न्यूज ' मधील बातमीचा दिलगिरी व्यक्त करत खुलासा करण्यात येत आहे की,चेंबूरच्या घाटले गावातील अरविंद पाटीलवाडी क्रमांक- १ मधील मैदानात शेड उभारल्यामुळे त्याचा वापर स्थानिक रहिवाशांनाच होणार आहे. त्यामुळे हे शेड बांधण्यास स्थानिक रहिवाशांचा किंवा स्थानिक मंडळाचा कोणताही आक्षेप नाही.या शेडचा वापर दोन्ही मंडळांना होणार आहे,अशी भूमिका आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी व्यक्त केली आहे.
आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. तसेच त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचे राजकिय नाराजी नाट्य निर्माण झालेले नाही.केवळ गैरसमजातून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे स्थानिक रहिवाशी असलेले साईधाम रहिवाशी मंडळही या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करणार नाही किंवा न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेणार आहे.
0 टिप्पण्या