संतोष प्रकाशन व सुबक आरती संग्रह २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष आणि राम मेस्त्री यांच्या इतर चार पुस्तकांचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न !!


नरडवे हायस्कूल चे माजी शिक्षक मनोहर काजरेकर सर यांना मुंबईत पुरस्काराने सन्मानित



नुकताच रविवार दि:- १ सप्टेंबर रोजी सायंकाळी डोंबिवली पूर्व येथे गणपती मंदिर संस्थान विनायक हाॅल मध्ये संतोष प्रकाशन व नवचैतन्य सामाजिक विकास संस्था (रजि.) आयोजित प्रकाशन  सोहळा कार्यक्रमात डॉ. जिवबा केळुसकर(माजी शिक्षण अधिकारी), डॉ खं. रं. माळवे (साहित्यिक व राष्ट्रकवी), राम मेस्त्री (उत्सव मुर्ती/साहित्यिक व कवी), श्रीनिवास नार्वेकर (जेष्ठ सिने- नाट्य अभिनेते/नाट्य दिग्दर्शक), बाबुराव शिरसाट (जेष्ठ साहित्यिक व बाल साहित्यिक), महेश काणेकर (ललित लेखक- कणकवली), राम मेस्त्री (जेष्ठ साहित्यिक/ कवी), सुगत उथळे (जेष्ठ अभिनेते/ नाट्य दिग्दर्शक), संतोष सावंत (आयोजक/पत्रकार/कवी/संपादक/अभिनेते) आणि शशिकांत सावंत (जेष्ठ पत्रकार/ साहित्यिक/कवी) या मान्यवरांच्या  हस्ते गणेश पुजन आणि दीप प्रज्वलन करून, कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला विलास देवळेकर लिखित, गायक व संगीतकार एकनाथ धयाळकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात "रौप्य महोत्सव स्वागत गीत !" सादर केले. आणि त्यास उपस्थितांचा उत्फुर्द प्रतिसाद टाळण्यांच्या कडकडाटात मिळाला. कवी- गायक व संपादक संतोष सावंत यांनी आपली थोडक्यात प्रस्तावना सादर केली. आणि त्या नंतर साहित्य  मंचावरील मान्यवरांचे, शाल- श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन, सत्कार करण्यात आले. प्रेक्षकांत दिपक कदम (मराठी हिंदी रंगभूमी अभिनेते), तसेच कवी  व संपादित संतोष सावंत यांचे २५ वे सुबक आरती संग्रह डॉ केळुसकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच संतोष सावंत यांनी संतोष प्रकाशन संस्थेवर लिहिलेल्या रेकॉर्ड गिताचे उद्घाटन ms. music nardave या you tub चॅनेलवरील  गीत डॉ. केळुस्कर यांच्या हस्ते रिलीज करण्यात आले. तसेच, जेष्ठ साहित्यिक व कवी राम मेस्त्री यांच्या ४ पुस्तकांचे योगियांची पाऊले, सोन्याची द्वारका, रंगमहाल आणि चौरंग अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात लोकार्पण करण्यात आले. पुस्तकांचे चौकार  मारणारे लेखक, राम मेस्त्री यांनी आपले प्रेरणादायक मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी मेस्त्री यांची नात उत्तरा मिलिंद  मेस्त्री हिने आपल्या आजोबांच्या विषयी बोलताना, उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच साहित्य मंचावरील इतर मान्यवरांनी समयसूचक भाषण केले. आणि डॉ केळुसकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलिक विचार व मार्गदर्शन केले. 

https://youtu.be/wXUCWekXs9M?si=h1jco5g1S_QeBRSx

         आणि त्या नंतर, महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांतील मान्यवरांचे शाल- श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यामध्ये विशेषत: प्रकाशक संतोष सावंत यांचे कणकवली नरडवे गावच्या हायस्कूल मध्ये त्यांना शिकविणारे त्यांचे गुरुवर्य मा. श्री. मनोहर काजरेकर सर यांना यथोचित शाल, श्रीफल, ट्रॉफी "उत्कृष्ट उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार" देऊन  गौरविण्यात आले. असे एकूण ३० मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मनोरंजन एका मिमिग्री आर्टिस्टने आपली कला दाखवली. तसेच गजानन नरवाडे यांनी पावा वादन करून लोकांची मने जिंकली. 

      

तसेच एक विशेष म्हणजे या कार्यक्रमात अक्षरश्री विलास देवळेकर यांनी संस्थेच्या नावावरुन रचना केलेल्या कवितेचे ६ फूट उंचीच्या कविता फ्लॅक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बहुतेकांनी त्या कविते सोबत फोटो ही काढले. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. तसेच, सौ. पुजा काळे ह्यांनी  कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करताना, कविता- चारोळी व गायिकेने विशेष रंगत आणत, त्यामुळे वातावरण उत्साही राहिल्याने, उपस्थितांची मने जिंकली. तसेच, सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या