बांद्रा पुर्व कडे जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक शेजारी बस थांबा रद्द करुन, पाच किलोमीटर अंतरावर न्यायालयासमोर महानगर पालिकेच्या जागेवर बस आगार आहे. तिथे "दरवर्षी खड्डे" पडतात. पण यंदा उशीर झाला आहे, खड्डे बुजविण्यासाठी. प्रवाशांनी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी तसेच, वरिष्ठ अधिकारीही यांनी लेखी तक्रार दाखल करूनही, दखल घेतली जात नाही. प्रवाशांना बस पकडताना, तिथल्या खड्ड्यांमुळे कित्येकजण पडले आहेत आणि पडत आहेत. आणि बस कलंटाना असे वाटते की, आम्ही बोटीत बसलो आहोत की काय ?
आणि वृत्तपत्रांत सरकार बातमी प्रसिद्ध करते की, खड्डे दाखवा, आम्ही त्वरित कारवाई करण्यात येईल. पण कारवाई होत नाही, मग आता खड्ड्यासाठी आणि जास्त बसेस सोडण्यासाठी ही आंदोलने करायची का ? पावसाळ्यात वेळेवर पोहचण्यासाठी गाडी पकडण्यासाठी धावपळ करावी लागते, एक तर नोकरी टिकविण्यासाठी. दुसरं महागाईत संसार सांभाळण्यासाठी. ह्या दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत करताना, आता खड्डे सांभाळून दिनक्रम सुरू होतो, तो खड्डे नसल्याचे खात्री करुन रात्रीचा प्रवास संपतो.
प्रवाशांची तीनच मागणी आहे की , एक बांद्रा रेल्वे स्थानक शेजारी जो जुना "बस थांबा कायम स्वरुपी" चालू करावा. कारण पावसात सर्व गटातील महिलांना- पुरुषांना- विद्यार्थ्यांना- वृद्धांना आणि रुग्णांना खुपच त्रास होत आहे. आणि दुसरं, डेपोतील खड्डे पावसाळ्यातच बुजविण्याची मेहरबानी करावी, आणि तिसरी बसेस पाच पाच मिनिटांत सोडण्यात यावे, जेणेकरून वेळेवर कार्यालयात- दवाखान्यात- शाळा- विद्यालयात आणि घरात पोहचू शकू. अशी नम्र विनंती, माय बाप सरकारला प्रवाशांच्या वतीने करत आहोत.
~ विलास देवळेकर
0 टिप्पण्या