बोधी सामाजिक सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रभाकर कांबळे सचिव पदी राजेंद्र जाधव तर खजिनदारपदी गौतम हरकुळकर यांची निवड.




मुंबई  (प्रतिनिधी) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मुंबई विभाग मुंबई यांच्या अंतर्गत अधिनियम 1950चे कलम 18 अन्वये व अधिनियम 1860 चे कलम 4 प्रमाणे बोधी सामाजिक सेवा मंडळ मुंबई या सामाजिक संस्थेची कार्यकारी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून संस्थेच्या अध्यक्षपदी विशेष कार्यकारी अधिकारी व गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे तर सचिव पदी सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव तर खजिनदार पदावर गौतम नामदेव हरकुळकर यांची एक मताने निवड करण्यात आली असून संचालक पदी अंकुश बाबू राजपुरे, गणेश दीपक शिंगरे, नंदिनी राजेंद्र जाधव व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्ष वनिता प्रभाकर कांबळे यांची निवड करण्यात आली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या