मुबंई ही देशाची आर्थिक राजधानी तसेच महाराष्ट्राची राजधानी म्हणून सर्वजगात प्रसिद्ध आहे. दरवर्षी कोसळणाऱ्या पावसाने मुबंईची दैना होते. सोमवारी दिनांक ८जुलै २०२४रोजी कोसळलेल्या एका दिवसाच्या पावसाने, अतिवृष्टीमुळे अखेर मुबंई तुंबली आणि विस्कळीत झाली. मुबापुरीची तुंबापुरी झाली. रेल्वे सेवा ठप्प झाली. रस्त्यावर गुढघाभर पाणी साचले होते. रस्त्यावरची वाहने अडकून पडली होती. नोकरदार वर्गाचे, नागरिकांचे अतोनात हाल झाले. लोक जागोजागी अतिवृष्टीमुळे अडकून पडले होते. रेल्वेचे वेळापत्रक पूर्ण कोलमडून गेले होते. मागील २६जुलै २००५ची लोकांना आठवण झाली.'नेमीची येतो पावसाळा 'म्हणीप्रमाणे मुंबईची तुंबापुरी झाली होती. दरवर्षी मुंबई महानगर पालिका आयुक्त, महापौर दावे करतात. मुबंईच्या प्रतिष्टेला शोभादायक नाही असे वाटत. नाले सफाईवर गटारे सफाईवर, मिठी नदीच्या सफाईवर करोडो रुपये दरवर्षी खर्च होतात. टेंडर मध्ये टक्केवारी ठरलेली असते.
कारण हा जनतेचा पैसा असून संबंधित यंत्रणा, प्रशासन लूटमार करत आहे. सर्वसामान्य नागरिकांना, करदाते यांना सोई सुविधा पुरविणे ही शासनाची मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असून कर्तव्य आहे. सद्यस्थितीत अशा घटनेला पाऊस जबाबदार नसून प्रशासन सर्वार्थाने जबाबदार आहे. मुंबईची तुंबापुरी होऊ नये यासाठी सक्षम उपाययोजना व सुयोग्य प्राधिकरण नियोजन ही काळाची गरज आहे.
शशिकांत रा. सावंत
पत्रकार /समाजसेवक /कवी
मो. नं 9930227985

.jpeg)
0 टिप्पण्या