अग्रलेखचा बादशहाचा वाढदिवसानिमित्त !


दै प्रहार वृत्तपत्राचे संपादक डॉ सुकृत खांडेकर यांचा वाढदिवस निमित्ताने त्यांच्याच दै प्रहार कार्यालयात जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सावंत, लेखक श्री प्रभू अग्राहरकर, साहित्यिक व कवी अक्षरश्री विलास देवळेकर आणि सुत्रसंचालिका- साहित्यिका व कवयित्री सौ पुजा काळे यांनी सदिच्छा भेट घेतली. सावंत आणि प्रभू यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. कवयित्री काळे मॅडम यांनी दोन अभंग सादर केले. आणि देवळेकर यांनी संपादक डॉ खांडेकर यांच्या नावावर आपल्या  खास शैलीत कविता सादर करून, कौतुकाची थाप मिळविली. आणि अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात विचारांची देवाणघेवाण करत वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि डॉ खांडेकरांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या