दलित पॅंथरच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती

आंबेडकर अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे सुखदेव सोनवणे यांचे आवाहन.


 मुंबई (प्रतिनिधी) पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथर  ची स्थापना करून आज 52 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचा वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक 9 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 ते 10 पर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे खासदार नामदार श्रीकांत शिंदे ,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार साहेब तसेच महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभुराजे देसाई साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून मार्गदर्शनही करणार आहेत.

        तरी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. सुखदेव सोनवणे व निमंत्रक शुभम सोनवणे यांनी  प्रसिद्धी पत्रका द्वारे कळवले आहे.

          दलित पॅंथरच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून कार्याध्यक्ष जितेंद्र देसाई विदर्भ प्रदेशचे आनंद खापर्डे आरपीआय नेते दलित दादा जगताप पॅंथर नेते दौलत सोनवणे लेखक व विचारवंत कांताराम सोनवणे आमदार सुनील दादा कांबळे उद्योजक गोरख कडलग व अमित जाधव शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील जाधव शाखाप्रमुख  बबलू बोर्डे ,विनोद मेश्राम, लेखक अशोक तावरे नागपूर शहर अध्यक्ष अमित खापर्डे आंबेगाव तालुका अध्यक्ष सागर सरोदे महेश जाधव सुधीर माशेरे  दिलीप माशेरे सरपंच सुनीता केदारी पप्पू शेठ मसुडगे , डॉ.राजेश थोरात डॉ .भरत वैरागे डॉ . कृष्णा चने डॉ. पी. टी . गायकवाड ,सोन्या आव्हाळे युवा नेते सागर मसुडगे जामील आवटी तसेच कन्हेरसर ग्रामस्थ व मुंबई प्रदेश मधील प्रमुख कार्यकर्ते आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असून अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी या वर्धापन दिन कार्यक्रमाचे संयोजन केलेले असून सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी आमच्या  प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या