अमोल मडामे यांची संजीवनी सहकारी पतपेढी (मर्यादित ) डोंबिवली च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.



      चाळीस वर्षे जुनी असलेली डोंबिवलीतील संजीवनी सहकारी पतपेढी (मर्यादित ) डोंबिवली च्या अध्यक्षपदी आयु.अमोल मडामे यांची बिनविरोध निवड मा. उप रजिस्टर को. ऑफ. सोसायटीज डोबिवली श्री. राठोड यांच्या उपस्थित करण्यात आली. त्यांचबरोबर उपाध्यक्ष म्हणून आयु. मनिष सरकटे, सदस्य म्हणून आयु. सुहास रोकडे, आयु. प्रतिभा खंदारे, आयु. नंदा लोखंडे,सौ. अर्चना कराडकर, आयु. गौतम सुतार, आयु. रवि राऊत, आयु, संगीता जाधव यांची निवड करण्यात आली.

         " अनेक जुन्या पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमातून संजीवनी पतपेढी गेल्या 40 वर्षापासून उत्तमरीत्या कार्यरत असून, संजीवनी पतपेढीचे वटवृक्ष करून बहुजन समाजास आर्थिक संजीवनी प्राप्त करून देण्याचा मानस आम्हा नवनिर्वाचित तरुण पदाधिकाऱ्यांचा आहे. "असे मत आयु. अमोल मडामे यांनी व्यक्त केले निवड प्रसंगी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या