प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
नेरुळ : नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. आमदार संदीप नाईक यांच्या माध्यमातून व मा. नगरसेविका सौ. मीरा पाटील यांच्या पुढाकाराने फ्रुटवाले सांस्कृतिक भवन, नेरुळ येथे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा १११ वा "मन की बात" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गतच नेरुळ पूर्व विभागातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये उच्चतम गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच जेष्ठ नागरिक व महिलांचाही छत्र्यांचे वाटप करून यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना संदीप नाईक यांनी पंतप्रधानांच्या मन की बात या उपक्रमाचे सखोल विवेचन केले. मन की बात या कार्यक्रमाद्वारे भारतातील जनतेला प्रत्येक राज्यात चाललेल्या घडामोडींची, उपक्रमांची, शेती विकासाची माहिती कशाप्रकारे मिळते याचा त्यांनी उदाहरणे देऊन आढावा घेतला. असे सांगून ते पुढे म्हणाले की नवी मुंबईमध्ये सर्व धर्म समभाव ही गणेशजी नाईक यांनी रुजवलेली संस्कृती आम्ही पुढे चालवत आहोत. त्याचप्रमाणे सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेबद्दल माहिती दिली. खूप कमी वेळात मीरा पाटील यांनी हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्णरित्या यशस्वीपणे आयोजित केला याबद्दल त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष तथा मा. सभागृह नेते रविंद्र इथापे, मा. सभापती तथा महामंत्री सौ. नेत्रा शिर्के, मा. भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ. माधुरी सुतार, भाजपा पदाधिकारी सौ. रूचिता करपे, सौ. नंदा इंदुलकर, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, विकास साठे , रणजीत दीक्षित, पत्रकार सुभाष हांडेदेशमुख आदी प्रमुख मांन्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय निंबाळकर, दिनेश गवळी, संदीप राठोड, राजेश पालवे, दीपक तांबे आदींनी खूप मेहनत घेतली.
--------------------------------
0 टिप्पण्या