संत कक्कय्या समाजाचे एक दिवशीय राज्यव्यापी धरणे आंदोलन संपन्न!



संत कककय्या समाजाला स्वतंत्र शासकीय आर्थिक विकास महामंडळ मिळावे यासाठी वीर शैव कक्कया कल्याण मंडळ मुबंईच्या वतीने एक दिवशीय राज्यव्यापी धरणे आंदोलन आझाद मैदान येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.

सकाळी दहा वाजता सुरु झालेले आंदोलन सायंकाळी ५वाजपर्यंत चालले. या आंदोलनासाठी मुबंई ठाणे, पूणे, सातारा,सोलापूर,कोल्हापूर,लातूर,जालना, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी तसेच महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून समाज बांधव मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

यावेळी समाजातील विविध भागातून आलेल्या समाज बांधवानी स्वतंत्र शासकीय आर्थिक विकास महामंडळ जो पर्यंत संत कक्कया समाजाला शासन देणार नाही तो पर्यंत हा लढा असाच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.आंदोलनसमयी महिलांनाची उपस्थिती लक्षनीय होती.जोरदार पावसातही संत कक्कया समाजातील बांधव एकजूट करुन आंदोलनस्थळी उपस्थित होते. जोरदार घोषणानी आझाद मैदान दनाणून गेले होते.

संत कक्कया समाजाने आर्थिक विकास महामंडळ साठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनास आमदार गणेश नाईक आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी भेट देऊन  आपला पाठींबा असल्याचे नमूद केले.

तसेचअनुसूचित यादी मधील अनु क्रम १८ नुसार ढोर, डोहोर, कंकय्या आणि कक्कय्या जाती साठी स्वतंत्र शासकीय महामंडळ, शासनाने निर्माण करावे ह्या प्रमुख मागणी सहित इतर मागण्या बाबत शुक्रवार २८ जून २०२४ रोजी आझाद मैदान मुंबई येथे राज्यभरातून विविध गाव / तालुका येथील सहभागी / जमलेल्या सर्व बांधवांचा प्रचंड समुदाय आणि त्यांचा आक्रोस पाहून मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दखल घेतली. मा मुख्यमंत्री यांचे आदेश नुसार वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळाचे शिस्टमंडळ मा मुख्यमंत्री च्या भेटीला विधान भवन दालन येथे गेले. या शिस्टमंडळात श्री महादेव शिंदे (अध्यक्ष वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई 

श्री यशवंत नारायणकार सचिव वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई)

श्री रवींद्र शिंदे (प्रवक्ते वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई )

श्री सूर्यकांत इंगळे (सहसचिव वीरशैव कक्कय्या कल्याण मंडळ मुंबई )

श्री हनुमंतराव सोनावणे( अध्यक्ष वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ पुणे )

श्री निवृत्ती सावळकर( अध्यक्ष समस्त कक्कय्या समाज महासंघ मुंबई )

श्री राजकुमार सोनावणे (अध्यक्ष, कक्कय्या समाज, संभाजी नगर )

श्री सोनोपंत कावळे ( पदाधिकारी , कक्कया समाज , संभाजी नगर )

श्री दिग्विजय शेरखाने ( पदाधिकारी कक्कय्या समाज , संभाजी नगर )यांचा सहभाग होता.

मा आमदार श्री ज्ञानराज चौगुले साहेब यांनी मा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे समवेत भेट घडवून सांगितले कि ढोर जाती साठी स्वतंत्र शासकीय महामंडळ निर्माण करावे ह्या मागणी साठी राज्य भरातून हा समाज हजारो च्या संख्येने आझाद मैदान येथे उपोषण साठी बसला आहे त्यांची इच्छा आहे कि आपण समक्ष आंदोलन स्थळी भेट देऊन सर्वाना संबोधित करावे. माननीय मुख्यमंत्री यांनी शांतपणे  एकूण घेतले.तसेच माझ्या वतीने मी मा शिक्षणमंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांची नेमणूक करीत आहे ते तुमचे गाऱ्हाणी ऐकतील आणि मला अवगत करतील,

मा शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर साहेब यांची भेट झाली त्यांना आपल्या मागण्या बाबत ४ पाणी निवेदन देण्यात आले , त्यांनी ते सर्व वाचले आणि म्हणाले कि , आपल्या समाजासाठी स्वतंत्र शासकीय महामंडळ हि प्रमुख मागणी आहे , ते पुढे म्हणाले कि ह्या अधिवेशन मध्ये म्हणजे १० जुलै २०२४ रोजी आर्थिक नियोजन समिती ची बैठक आहे त्या मध्ये हा विषय घेतला जाईल आणि पुढे वरच्या सभागृहामध्ये मंजूर करवून आदिवेशन च्या अंतिम दिवशी म्हणजे १२ जुलै २०२४ रोजी ह्या बाबत ची घोषणा करण्या बाबत सकारात्मक प्रयत्न होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या