कोकण दीप मासिकाच्या २२व्या वर्धापन दिना निमित्त साप्ताहिक भगवे वादळचे संपादक, पत्रकार दत्ता खंदारे यांना नुकताच दादर येथील मुंबई मराठी संग्रालय सभागृहात जेष्ठ पत्रकार,संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार साक्षी नाईक, दापोली विधानसभा शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर कदम यादी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
पत्रकार दत्ता खंदारे यांना सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक संस्था आणि संघटनानी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. दत्ता खंदारे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने विविध क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या