मॉडेल कॉलेज मध्ये नशाबंदी जनजागृती







नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, यांचे वतीने २६ जून २०२४ रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त  व जागतिक नशेबाजी आणि अवैध तस्करी विरोधी दिन निमित्ताने मॉडेल कॉलेज पूर्व येथे मुलांमध्ये नशाबंदी संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्य संघटक,नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य,अमोल स. भा. मडामे यांचे मार्गदर्शन कॉलेजच्या तरुणांना करण्यात आले. यावेळी ठाणे  संघटक रविंद्र गुरचळ यांनी ही नशेचे दुष्परिणाम समजून सांगितले. कल्याण तालुका संघटक संतोष सावंत यांनी नशा बंदी पोवाडा सादर केला.

     Api पांडूरंग पिठे यांनी ही नशाबंदी संदर्भात मुलांना मार्गदर्शन केले.  तसेच त्यांनी नशा करणार नाही याबद्द्ल उपस्थितांकडून शपथ करून घेतली. पोलिस हवालदार  संजय पानसरे, पोलिस हवालदार हांडे, व मॉडेल कॉलेज चे शिखरे सर हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या