भक्तिवेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मीरारोड आणि संकटमोचन हनुमान मंदिर, लोढा हेरिटेज, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळ्यांचे चिकित्सा शिबिर या सामाजिक उपक्रमाला काल दोन वर्षे पूर्ण झाली . सदर उपक्रम हा डोंबिवली येथील श्री बिमल नथवाणी यांच्या प्रयत्नातून
भक्तिवेदांत हॉस्पिटल चे डॉ. संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व चॅरिटी व्यवस्थापक श्रीविद्या मॅडम तसेच ऑफिस इनचार्ज दुर्गा वडे मॅडम यांच्या समन्वयाने जून 2022 पासून सामन्य नागरिकांचे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे शिबिरास सुरुवात संकट मोचन हनुमान मंदिर - लोढा हेरिटेज येथे करण्यात आली.
ह्या शिबिराचे आयोजन वर्षभर श्री संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात केले जात होते. मात्र नागरिकांचे सुविधेसाठी गेल्या एक वर्षांपासून नांदिवली येथील स्वामी समर्थ माठाच्या समोर विश्वा इंजिनिअरिंग च्या कार्यालय परिसरात आयोजित करण्यात येते. सदर कार्यालयाची जागा उपलब्ध करून इतरही आवश्यक सहकार्य श्री किशोर आढळकर व त्यांचे कर्मचारी करत असतात
सदर शिबिराचे आयोजन व नियोजन करण्यात श्री बिमल नथवाणी , श्री किशोर आढळकर , श्री हनुमान चौधरी, तसेच रोटरी क्लब ऑफ मीड टाऊन चे अध्यक्ष प्रदीप बुडबाडकर त्याच प्रमाणे श्री गुणवंत पाटील, शिव शंकर कनोजिया ,अशोक धांदा , भारतभूषण मिश्रा यांचे मोठे योगदान असून न्यू श्री सद्गुरू सोसायटी चे सदस्यांचे देखील सहकार्य मिळत आहे. तसेच भक्ति वेदांत हॉस्पिटल चे शिबीर समन्वयक राकेश कनोजिया व अमोल पाटील ह्यांची देखील मोलाची भूमिका शिबिराचे आयोजनात असते.
0 टिप्पण्या