इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन तर्फे शौर्य सन्मानचिन्ह विजेते माजी सहाय्यक पोलिस आयुक्त एकनाथ खोल्लम यांच्या "वर्दी" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, नुकताच पत्रकार भवन येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
प्रमुख अतिथी जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या शुभहस्ते "वर्दी" पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ.लक्ष्मण शिवणेकर होते, गप्पा गोष्टीकार जंयत ओक, आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्ते डॉ.रत्नाकर अहिरे , माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवानसिंग गौड व जनसेवक सुरज भोईर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित. वर्दी पुस्तकाचे लेखक एकनाथ खोल्लम व सौ. निर्मला खोल्लम हे सुद्धा मंचकावर उपस्थित होते.सदरहु सोहळ्याची संकल्पना, आयोजन व नियोजन एन.डी.खान आणि सौ.सलमा खान यांनी केले होते.
यावेळी एकनाथ खोल्लम यांच्या वर तयार करण्यात आलेली टी.एम.जी क्रियेशन्स निर्मित "वर्दीतील हळव्या मनाचा माणूस" एकनाथ माधव खोल्लम चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. डी. खान यांनी केले. यासमयी कु. क्रीशा गडा हिने साकार केलेला "एक सल्यूट पोलिसांठी" ह्या अभिनयाने उपस्थित प्रभावित झाले.
सदरहू प्रकाशनाचे औचित्य साधून, आयोजित करण्यात आलेल्या 'संगीतमय' कार्यक्रमात जवानसिंग गौड, सुरज भोईर, एकनाथ खोल्लम, विजय मोरे, एकनाथ धयाळकर, महेक शेख, श्रेया भणगे, नासिर जी, शफी जी व विलास बार्शिगे यांनी विविध चित्रपटाची उत्तम गीते सादर करून, उपस्थितांना 'मंत्रमुग्ध' केले. तसेच सुप्रसिद्ध गायक सतीश शर्मा व सौ.रेवती शर्मा यांनी एकनाथ खोल्लम यांच्या वर आधारित आपली रचना सादर केली. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सुत्रसंचालन सौ. छाया अक्कलकोटे यांनी उत्कृष्टपणे केले. तर संगीतमय कार्यक्रमाचे निवेदन श्रेया भणगे यांनी उत्तमरीत्या केले. याप्रसंगी "वर्दी पुस्तकाचे" शब्दांकन करणारे प्रा.महेश कुलसंगे , मुद्रीत शोधन करणारे काशिराम खर्डे, कार्यक्रमाची प्रसिद्धी करणारे अक्षरश्री विलास देवळेकर आणि सर्व गायक कलाकारांचा सन्मान करण्यात आला. शैलेंद्र अक्कलकोटे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले, संजय म्हात्रे,कवी जनार्दन पाटील व संतोष भालेराव यांची विशेष उपस्थिती होती.
सदरहू कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिपक कदम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
वर्दी पुस्तकाचे लेखक माजी सहाय्यक पोलीस आयुक्त एकनाथ खोल्लम यांच्या नावाच्या आद्य अक्षराने अक्षरश्री विलास देवळेकर यांनी लिहिलेली कविता सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे नियोजन उत्तम होते.

.jpeg)
0 टिप्पण्या