भरत तानाजी बाणे यांचे अल्पशा आजाराने निधन
सिंधुुदूर्ग जिल्ह्यातील शिरवंडे गावचे व सद्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले भरत तानाजी बाणे कवी संतोष सावंत यांच्या बहिणीचे मिस्टर यांचे वयाच्या 69 व्या वर्षी अल्पशा आजाराने काल 7 जून रोजी उपचारादरम्यान मुलुंड येथील हॉस्पिटल मध्ये निधन झाले. आज 8 जून रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर डोंबिवली पूर्व येथील स्मशानभूमीत अग्निसंस्कार करण्यात आले.
भरत तानाजी बाणे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत. सुख दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते पुढे होऊन प्रत्येकाला आधार अथवा धीर देत असत. त्यांचा मनमिळावू असा हा स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या परिवारात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तसेच त्यांचे पाच भाऊ व दोन बहिणी असा परिवार असून त्यांच्यावर हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो. व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीत त्यांना सर्वजण भावपूर्ण आदरांजली वाहत आहेत.
दहावे हा विधी सोमवार दि.१७ जून २०२४ रोजी शिवाजी पार्क दादर येथे होईल. तर बारावे तेरावे हे कार्य विधी डोंबिवलीतील त्यांच्या राहत्या घरी बुधवार दि.१९ जून २०२४ रोजी होतील.
बाणे परिवार व सावंत परिवार आणि मित्र मंडळी व लोकसत्यवाणी
न्युजच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली .💐🙏🏻


0 टिप्पण्या