प्रतिनिधी ( नवी मुंबई ) सुभाष हांडे देशमुख :
श्री रामकृष्ण नेत्रालय चेंबूर नूतन शाखेचे उद्घाटन चेंबूर येथील सेंट्रल अँव्हेन्यू रोड, डायमंड गार्डन येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उत्साही वातावरणात, दिनांक २३ जून रोजी पार पडले. श्री राम कृष्ण नेत्रालयाच्या अत्यंत आधुनिक सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या या उद्घाटन प्रसंगी संचालक डॉक्टर सुहास देशपांडे, डॉ. नितीन देशपांडे, डॉ. प्राजक्ता देशपांडे , डॉ. सुनिती देशपांडे ज्येष्ठ नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने तसेच रणजीत दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री रामकृष्ण नेत्रालय हे सर्व स्तरातील लोकांना उच्च दर्जाची आय केअर सेवा उपलब्ध करून देणार असून डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांसाठी लागणारे सुपर स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टर व लागणारे आधुनिक तंत्रज्ञान येथे उपलब्ध होणार आहे.
कॅटरॅक्ट, ग्लोकोमा, रेटिना, पीडियाट्रिक, लेसिक, कॉर्निया यासारख्या सुपर स्पेशालिस्ट सर्विसेस येथे परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहेत.
चष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी लेसिक तंत्रज्ञान सगळ्यांना सर्वश्रुत आहे. श्री रामकृष्ण नेत्रालयात याबाबतीचे नवीन तंत्रज्ञान एटॉस स्मार्ट साईट लेसिक (ATOS, Smart Sight Lasik) हे आले आहे. अतिसूक्ष्म छेदातून नो फ्लॅप ऑल लेझर तंत्रज्ञानाने लेसिक (Lenticular ) सर्जरी अतिशय सुरक्षित आणि वेदना विरहित होणार असून हे तंत्रज्ञान पश्चिम भारतात सर्वप्रथम येथे आणले गेलेले आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रिये मध्ये देखील डिजिटल गाईडन्स कॅटरॅक्ट सर्जरी ( कॅलिस्टो )झाईस, जर्मनी ( Callisto ) ( Zeiss Germany) हे नवीन तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ब्लेडलेस रोबोटिक लेझर एली (ALLY) लेझर कॅटरॅक्ट सर्जरी चे एली लेंसार यूएसए (ALLY Lensar U.S.A.) हे भारतात सर्वप्रथम तंत्रज्ञान श्री रामकृष्ण नेत्रालयामध्ये कार्यरत आहे. या तंत्रज्ञानाने वेदना रहित, अचूक शस्त्रक्रिया होत असून डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे अग्रगणी तंत्रज्ञान आहे.
काच बिंदूचे अत्याधुनिक मायक्रो इनसीजन ग्लोकोमा सर्जरी ( Micro Incision ) ( Istent ) रेटिना सर्जरीसाठी सुचरलेस ऍडव्हान्स विट्रेक्टटोमी ( Vitrectomy ) सर्जरीसाठी कॉन्स्टेलेशन अल्कोन यूएसए( constellation Alcon ,USA ) हे देखील येथे असणार आहे .
लेझर असिस्टेड बुबुळांच्या सर्जरी, पूर्ण बुबुळ न बदलता केवळ आजारी भागाचा पापुद्रा बदलण्याची ( लॅमेलर) क्ष( Lamellar ) कॉर्निया सर्जरी येथे उपलब्ध होणार आहे.
लहान मुलांमध्ये वाढता चष्म्याचा नंबर नियंत्रण करण्यासाठी मायोपिया क्लिनिक देखील येथे कार्यरत असेल, नेत्र रुग्णासाठी कम्प्लीट आय केअर, अंडर वन रूफ येथे उपलब्ध करून मिळेल. आमचे कन्सल्टंट, ऑप्टोमेट्रीस्ट आणि शंभराहून अधिक सपोर्ट स्टाफ हे चेंबूरकरांच्या सेवेत हजर असतील.
0 टिप्पण्या