जे एम एफ संस्थेत जागतिक योग दिवस व जागतिक संगीत दिवस उत्साहात साजरा.




 जे एम एफ संस्थेत जागतिक योग दिवस व जागतिक संगीत दिवस उत्साहात साजरा.

       निरोगी शरीर हीच खरी संपत्ती तर मनाला प्रफुल्लित ठेवायचे असेल तर  सुर संगीतामध्ये हरवून जाणे होय.

 जे एम एफ संस्था संचलित जन गण मन शाळा आणि विद्यामंदिर तसेच ज्युनिअर विद्यालय,  वंदे मातरम् पदवी महाविद्यालय यामधील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस सादर केला.

      कार्यक्रमाचे उपस्थित पाहुणे अणूव्रत संस्थेचे पदाधिकारी हेमलता मॅडम, श्री.विनोद राठोड, रीना मॅडम, प्रीती मॅडम, ब्रह्माकुमारीज कडून डाॅ निखिल, तेजा दीदी, शामला राव मॅडम, वैद्य सर,  डाॅ नाडार सर, डाॅ वनिता, ह्यांची उपस्थिती होती तर संस्थेचे संस्थापक माननीय डॉ राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा कोल्हे त्याच बरोबर इतर पदाधिकारी ह्यांनी सरस्वती पूजन करून जागतिक योग दिवस बद्दल व जागतिक संगीत दिवस बद्दल माहिती दिली.

    मन आणि तन निरोगी , आनंदी आणि सुदृढ राहण्यासाठी योगा करणे अतिशय गरजेचे आहे.शरीर निरोगी असेल तर मन आनंदी राहते, आणि मनाला आनंदी ठेवण्यासाठी संगीत ऐकणे गरजेचे आहे असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले. हळुवार संगीत कानावर पडत असताना शरीर व मन आपसूकच ध्यान धारणेत तल्लीन होऊन जाते हीच योग ची पहिली पायरी व हीच संगीतातली शक्ती आहे , संगीत ही आत्म्याची भाषा आहे ,असे डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.

        स्वागत समारंभ झाल्यानंतर जागतिक संगीत दिवस कारणाने शिशु विहार ते इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यानी सुंदर गाणे म्हंटले.त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री.विनोद राठोड यांनी योगा कसा करायचा ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले व ते मुलांकडून करून घेतले.त्याच बरोबर प्रीती मॅडम ने देखील वेगवेगळी आसने करून दाखवली.शारीरिक प्रशिक्षक श्री रमेश 


वग्गे, व सौ. वैशाली शिंदे यांनी देखील योग साधना करून दाखवली व मुलांकडून करून घेतली. 

          कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉकटर यांनी संगीताच्या तालावर नृत्य करून दाखवून व्यायाम कसा करायचा ते दाखवले.त्यामुळे तुमच्या मधे दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक श्रम आवश्यक असलेली क्षमता, कुवत टिकवून ठेवण्यास मदत होते.असे सांगून केवळ योगासने न करता संगीत ऐकत नृत्याद्वरे ही शारीरिक ,मानसिक क्षमता वाढण्यास मदत होते.असे सांगितले.

       शिशिविहर ते महाविद्यालय मधील सर्वच मुलांनी उत्साहाने आजच्या कार्यक्रमात सहभाग दर्शवला.

      कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता आठवी मधील संजना आणि अपेक्षा ह्या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन श्रेया ह्या विद्यार्थिनी ने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या