पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनशेजारी ड्रेनेज लाईन खोदण्याने स्थानिक संतप्त



*मानखुर्द गावातील प्रकार* 


मुंबई- मानखुर्द गावामध्ये एका नवीन इमारतीसाठी सार्वजनीक ठिकाणच्या पिण्याच्या पाईपलाईन शेजारीच ड्रेनेज लाईनसाठी  खुदाई सुरू  करण्यात आल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहे. संबंधित  विकासकांच्या या बेकायदा  ड्रेनेज लाईनला परवानगी देवू नये अशी मागणी एका  निवेदनाद्वारे स्थानिक नागरिकांसह काही सामाजिक मंडळांनी  पोलीस आणि पालिका आयुक्तांकडे केली आहे. 


मानखुर्दमधील एका नवीन इमारतीमधील रहिवाशांसाठी टाकली जाणारी ड्रेनेज लाईन स्थानिक लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या बाजूलाच टाकली जात आहे. या ड्रेनेज लाईनला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्याचप्रमाणे ही ड्रेनेज लाईन येथील ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या सेंट अँथनी चर्चच्या गेट आणि शाळेसमोर सोडली जात आहे.त्यामुळे याठिकाणी ये- जा करणाऱ्या लोकांना आणि शाळेतील मुलांना सोडायला येणार्‍या पालकांना फारच त्रासदायक ठरणार असल्याची भीती  व्यक्त करत या चर्चच्या व्यवस्थापनानेसुद्धा ही ड्रेनेज  लाईन टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.त्यांनी संबधितांना तशी लेखी  निवेदने सादर केली आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या