डोंबिवली एमआयडीसी आज झालेल्या अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटा मुळे पुन्हा एकदा स्थानिक एमआयडीसीतील रहीवाशी च्या जीवन मरणाचा प्रसंग निर्माण झाला आहे. मागील वेळेस झालेल्या स्फोटा च्या वेळेस एमआयडीसीतील कंपन्या स्थलांतरित कराव्यात असा सर्वत्र जोर होता. तो नंतर कागदोपत्रीच राहीला आणि पुन्हा जैसे थे आता परत कंपनी स्थलांतरित करण्या संदर्भात आवाज सगळी कडुन उठेल आणि काही होणार नाही.
काही मार्ग निघेल यासाठी स्थानिक लोकांना पुढील स्फोटा ची वाट पाहावी लागेल का ? असे होऊ नये.. पण दुर्दैवाने बोलावे लागते आहे. या स्फोटा च्या हादर्याने एमआयडीसीतील रहिवाशां च्या घराच्या काचा मोठ्या प्रमाणात फुटल्या आहेत तसेच एमआयडीसीतील बहुतेक बिल्डींग या 25 वर्षा वरील आहेत. त्या मुळेच साहजिकच या स्फोटा मुळे कमजोर होऊ शकतात स्ट्रचर ऑडिट सर्व बिल्डींग चे करावेच लागेल नाहीतर भविष्यात आजुन काही दुर्घटना होऊ शकते. या संदर्भात आमदार राजु दादा यांना भेटून यावर काय उपाय योजना करता येईल. याची माहीती घेतली जाईल.



.jpeg)
0 टिप्पण्या