विवेक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अंधासाठी बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

 

विवेक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे अंधासाठी बुद्धिबळ स्पर्धा  संपन्न


मुंबई- मानखुर्द येथील विवेक एज्युकेशन फाऊंडेशन संचालित डॉ.एपीजे अब्दुल कलाम अंध मुलांच्या शाळेच्यावतीने नुकतीच अंध खेळाडूंसाठी भव्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली  होती.या स्पर्धेमध्ये मुंबईसह  राज्याच्या कानाकोपर्‍यातील अंध बुद्धिबळ खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 



या अंध बुद्धिबळ  खेळाडूंच्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्त्यां,अ‍ॅड.आभा सिंग होत्या.तर  स्पर्धेतील रेफरी म्हणून पुण्यातील अंध सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सामंत तसेच गोवंडीतील  सामाजिक कार्यकर्ते जगजीवन पाटील हे  उपस्थित होते.या अंध  शाळेच्या संचालिका प्रभा शिंदे,त्यांचे पती विवेक शिंदे आणि त्यांची कन्या कॅप्टन दीप्ती शिंदे-वाघ यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या अंध खेळाडू बुद्धिबळ स्पर्धेत राज्याच्या विविध जिल्ह्यातील २४० अंध खेळाडू सहभागी झाले होते.या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना रोख रकमेचे पारितोषिक,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्या आभा सिंग यांच्या देण्यात आले.यावेळी आभा सिंग यांनी आपले मनोगत  व्यक्त सांगितले की,या मानखुर्दमधील अंध शाळेच्या  संचालिका प्रभा शिंदे आणि त्यांची कन्या दीप्ती या  मायलेकींच्या अंध , दिनदुबळ्या आणि गरजू मुलांसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सलाम करावासा वाटतो.या मुलांना अगदी मोफत शिक्षण देऊन त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करण्याचे पुण्यकर्म  त्यांनी केले आहे.या स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील अनेक बुद्धिबळ शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या