आचारसंहितेपूर्वी पुरस्कार वाटप करा ;अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार !

आचारसंहितेपूर्वी पुरस्कार वाटप करा ;अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार !
     
 आंबेडकरी चळवळीतील 
   विचारवंतांचा इशारा 

मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारांसह अन्य पुरस्कार गेली चार वर्षे म्हणजे २०१९ ते २०२३ पर्यंत शासनाच्या उदासीनतेमुळे वितरित केलेले नाहीत.त्यामुळे राज्यभरातील आंबेडकरी विचारवंत आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये सरकारविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.तरी निवडणूक आचारसंहिता लागु होण्याआधी या पुरस्कारांचे वितरण करावे,
अन्यथा आंबेडकरी जनता आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकील,असा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेते आणि विचारवंतांनी दिला. 

राज्य शासनाने आत्तापर्यंत  महाराष्ट्र भूषण तसेच आरोग्य खाते,क्रिडा खाते,
आदिवासी खाते,सांस्कृतिक खाते आदि पुरस्कारांचे तत्काळ वितरण केले आहे.
मात्र सन १९८९ पासून सुरू असलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषणसह अन्य पुरस्कारांबाबत शासन हेतूपुरस्पर दूजाभाव करीत आहे.तरी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पुरस्कारांचे वितरण न झाल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांतील अखंड आंबेडकरी समाज बहिष्कार टाकेल,असा निर्वाणीचा इशारा आंबेडकरी चळवळीतील नेते नामदेव साबळे यांनी दिला आहे.या  पुरस्कारांबाबतची अंतिम निवड यादी तयार असूनही केवळ मुख्यमंत्र्यांची  पुरस्कार वितरणासाठी  तारीख आणि मंजुरी मिळत नसल्याने हा पुरस्कार वितरण सोहळा पुन्हा एकदा रखडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या