आयकर भवन मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा चा धुमधडाक्यात सांगता सोहळा !
नुकताच आयकर भवन मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा चा सांगता सोहळा निमित्ताने, श्री संजय कुमार. प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि सदस्य केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, श्री विनय सिन्हा. आयकर आयुक्त, प्रशासन, टी पी एस, जेष्ठ नाट्य- चित्रपट अभिनेते अशोक सराफ. नाट्य- चित्रपट अभिनेते संजय खापरे. जेष्ठ नाट्य- चित्रपट अभिनेत्री राजश्री काळे आणि मराठी चित्रपट- मालिका अभिनेत्री- कवयित्री तसेच सूत्रसंचालिका सौ. पुजा काळे ह्या मान्यवरांच्या हस्ते, दीपप्रज्वलन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, सरस्वती देवीच्या प्रतिमेची पूजा करुन, कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांना "पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह" देऊन स्वागत करण्यात आले.
तद्पुर्वी मराठी संगीतावर नृत्य सादर करण्यात आले होते. मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांनी, "मराठी भाषेचे आणि ह्या उपक्रमांचे कौतुक" आपल्या भाषणात केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आले होते, त्याचे पुरस्कार वितरण सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते "सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह" देऊन, सत्कार करण्यात आले.
त्या अगोदर, आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने, वृत्तपत्र साप्त. भगवे वादळने "वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे" यांच्या जयंतीनिमित्त विशेष अंकाचे प्रकाशन श्री संजय कुमार. प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आणि महिलांना हळदी कुंकू समारंभांत भेटवस्तू देऊन 'आनंदोत्सवात' पार पडला आहे. आणि सर्वांना तिळगुळ लाडूचे वाटप करण्यात आले. आयकर कर्मचारी महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणि ह्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री प्रमोद वाघे यांनी केले. आणि ह्या कार्यक्रमाला आयकर विभाग स्थानीय लोकाधिकार समितीचे मोलाचं सहकार्य लाभले आहे.


0 टिप्पण्या