२०० स्पर्धकांच्या सहभागासह, रोटरॅक्ट चषक - जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण





 २०० स्पर्धकांच्या सहभागासह, रोटरॅक्ट चषक - जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण


दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली व भोईर जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवण क्रीडा संकुल येथे रोटरॅक्ट चषक या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नमूद स्पर्धा सुमारे पाचशेहून अधिक प्रेक्षक वर्गांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. सुमारे २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत ६ वेगवेगळ्या वयोगटातून भाग घेतला.


उपरोक्त स्पर्धेच्या माध्यमातून रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवलीने या नव्या तरुण खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले व त्यांचे मनोबल वाढवायचा प्रयत्न केला.

भोईर जिमखानाचे सर्वेसर्वा व रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली चे अध्यक्ष या दोघांनी देखील बाल स्पर्धकांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या