चॅनल कॉर्नर सोसायटी कामोठे येथे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधुन,श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.






चॅनल कॉर्नर सोसायटी कामोठे येथे प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधुन,श्री सत्यनारायण महापुजेनिमित्त  विविध कार्यक्रम संपन्न.

=================================================


   सालाबादप्रमाणे  शुक्रवार दिनांक २६ जानेवारी २०२४  रोजी ७५ व्या  प्रजासत्ताकदिनी श्रीसत्यनारायण महापुजेचे आयोजन सोसायटीच्यावतीने करण्यात आले होते. सुरुवातीला सकाळी १० वाजता सोसायटीचे अध्यक्ष श्री गंगाराम नथु माळी यांच्या हस्ते सोसायटीच्या प्रांगणात ध्वजारोहण संप्पन झाले, याप्रसंगी अध्यक्ष व कार्यक्रमाचे स्वागतमूर्ती  श्री गंगाराम माळी , सचिव - श्री दिनेश तुरे , उपाध्यक्ष -श्री परशुराम पाटील, सदस्य - श्री संतोष तुरे , विनायक नाईक ,रुपाळी कांबळे यांनी प्रजासत्ताकदिनाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले.  महिलांचे हळदीकुंकू दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्सहात संपन्न झाले. यावेळी १००  महिला उपस्थित होत्या, त्यांनी संगीत खुर्ची व डान्सद्वारे सदर कार्यक्रमाचा आनंद साजरा केला.    तसेच  श्रीसत्यनारायण महापुजेनिमित्त सोसायटीत दुपारी १ ते २ या वेळेत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धचे आयोजन अभ्युदय बँक शाखा कामोठे यांच्या विद्यमाने करण्यात आले होते , सदर स्पर्धेत पहिला गट ३  ते ८  वर्ष व दुसरा गट ९  ते १२  वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन  सदर चित्रकला स्पर्धत आपली गुणवता दाखवली. सदर शाखेमार्फत सर्वांनां सर्वाना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले . तसेच पहिला वयोगट ३ ते ८ प्रथम क्रमांक- श्रीयांशी बंधारे , द्वितीय  क्रमांक- रेवा कदम, तृतीय -आरोही कांबळे  तसेच दुसरा गट ९  ते १२ वयोगट प्रथम क्रमांक- नमीरा शेख ,  द्वितीय  क्रमांक श्रीष्टी सिंग , तृतीय क्रमांक  -अक्षया - शक्तिवेल, यांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले  करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष श्री गंगाराम माळी ,सचिव श्री दिनेश तुरे , उपाध्यक्ष - श्री परशुराम पाटील, उपसचिव -राजेश पाचुपते , श्री देवानंद भिसे व कार्यकारी मंडळ तसेच सोसायटीतील सर्व सभासद व  रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        या दिवशी दुपारी ४ वाजता श्री सत्यनारायण महापुजा श्री विनायक नाईक व सौ रुपाली नाईक यांच्या हस्ते संप्पन झाली. श्रीच्या भक्तीत सर्व  वातावरण  भक्तीमय बनले होते आणि श्री सेवेत सर्वानी  स्वतःला झोकून दिले होते. सायंकाळी ६ वाजता बुवा - परशुराम पाटील , वादनकार -वरद खुंटे व भजनमंडळी याचे सुश्राव्य भजन संप्पन झाले. भक्तजनांच्या मनोरंजनार्थ रात्रौ - ८ वाजता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम -डान्स व गाणी यांद्वारे सदर कार्यक्रमात मुलांनी रंगत आणली. सोसायटीच्या वतीने सहभागी सर्व मुलांचे आकर्षक ट्रॉफी देऊन कार्यकारी मंडळ व जेष्ठ सभासदांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सर्व सभासद व रहिवाशी व परिसरातील भक्तगण यांनी मोठ्या संख्येने  महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सोसायटीच्या वतीने आचारी श्री राजेंद्र सावंत ,श्री संदेश गुडेकर , श्री राजेंद्र सावंत , गंगाराम माळी , परशुराम पाटील , पत्रकार व सचिव दिनेश तुरे यांचे तसेच महिला मंडळ व जेष्ठ सभासद , कार्यकारीमंडळ यांचे स्वागत करण्यात आले.   सामुदायिक  डान्सद्वारे  शेवटी  कार्यक्रमाची  सांगता करण्यात आली . कार्यकारी मंडळाच्या वतीने सर्व  वर्गणीदार - देणगीदार सभासद व रहिवाशी यांचे आभार मानण्यात आले . एकंदरीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात भक्तीभावाने सदर कार्यक्रम संप्पन झाला. 


दिनेश तुरे ( मुक्त पत्रकार)

कामोठे -पनवेल 

मो .९९६९२७१५१३

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या